एखाद्या गोष्टीबद्दलचे आपल्याला काही माहित नसेल आणि त्याबाबत काही शोधायचे असले तर आपण सगळ्यात आधी काय करतो तर गुगलवर जातो. गुगल हा आपल्यातील अनेकांना सर्वात जवळचा मित्र किंवा मार्गदर्शक वाटतो. तरुणी किंवा महिलांच्या बाबतीत सौंदर्य ही सर्वात महत्त्वाची मानली जाणारी गोष्ट (Google Search). आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते. नैसर्गिक सौंदर्य तर असतेच पण हे सौंदर्य खुलवण्यासाठी आपण अनेकदा ब्यूटी प्रॉडक्टसची (Beauty products) मदत घेतो. जागतिक बाजारात सध्या ब्यूटी प्रॉडक्टसच्या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा असून सतत नवनवीन कंपन्या आपली नवनवीन उत्पादनांच्या माध्यमातून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. इतकेच नाही तर वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत या कंपन्या महिलांना आपली प्रॉडक्ट्स घ्यायला भाग पाडतात. नेटीझन्स गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करत असलेल्या ब्यूटी प्रॉडक्टसची माहिती नुकतीच समोर आली आहे (Most searched beauty products) . आता अशी कोणती प्रॉडक्ट आहेत जी सर्वाधिक सर्च केली जातात, त्याविषयी...
१. Gucci Perfume
जगभरात महिला आणि पुरुष सर्वाधिक प्रमाणात वापरत असलेले प्रॉडक्ट म्हणजे परफ्यूम. केवळ स्वत:साठीच नाही तर एकमेकांना गिफ्ट देण्यासाठीही अनेकदा आपण परफ्यूमची खरेदी करतो. बाहेर जाताना किंवा ऑफीसला जाताना आपल्याला फ्रेश वाटावे यासाठी आपण आवर्जून परफ्यूमचा वापर करतो. तर Gucci कंपनीचा दिवसभर टिकणारा परफ्यूम गुगलवर सर्वाधिक सर्च केला जातो.
२. Clarins Double Serum
चेहऱ्याचे सौंदर्य ही तरुणांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगभरात प्रत्येक व्यक्तीला आपली त्वचा नितळ आणि सुंदर असावी असे वाटते. इतकेच नाही तर आपण लवकर म्हातारे होऊ नये अशीही प्रत्येकाची इच्छा असते. अशांसाठी हे सिरम हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेचे पोषण तर होतेच पण त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.
३. Nars Sheer Glow Foundation
मेकअप करायचा असेल की फाऊंडेशन हा त्यातील अगदी महत्त्वाचा घटक असतो. कन्सिलरनंतर लावले जाणारे फाऊंडेशन मेकअपसाठी सर्रास वापरले जाते. यामध्ये प्रत्येकाच्या त्वचेच्या रंगानुसार, पोतनुसार फाऊंडेशन वापरले जाते. मेकअपचा बेस म्हणून उपयुक्त असलेले हे फाऊंडेशन त्वचा एकसारखी दिसण्यासाठी महत्त्वाचे काम करते. चेहऱ्यावर ग्लो येण्यामध्येही या फाऊंडेशनचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे तुम्हीही मेकअपसाठी चांगल्या फाऊंडेशनच्या शोधात असाल तर Nars Sheer Glow Foundation हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारी चमक तुमचा लूक खुलवण्यास मदत करेल.