Join us  

Diwali : दिवाळीत फ्रेश - टवटवीत दिसायचंय? 'या' छोट्याश्या लाकडाचा करा 'असा' वापर; ७ दिवसात चेहरा क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 5:52 PM

Mulethi Benefits for Skin Care : त्वचेवर मुलेठी पावडरचा वापर नेमका कसा करावा?

आयुर्वेदात त्वचेसाठी मुलेठीचे (Skin Care) अनेक फायदे आहेत (Mulethi). त्वचेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मुलेठी मदत करते. त्वचेव्यतिरिक्त घसा खवखवणे किंवा नाक बंद असल्यास चघळण्यासाठी दिले जाते. यामुळे सांधेदुखीचाही त्रास दूर होतो. मुलेठीमध्ये कॅल्शियम, ग्लायसिरीझिन ऍसिड, अँटिऑक्सिडंट्ससह प्रोटीन असते.

लवकरच दिवाळी या सणाला सुरुवात होईल. दिवाळीनिमित्त (Diwali) त्वचा टवटवीत दिसावी, असं प्रत्येकाला वाटतं. जर आपल्याला दिवाळीला सुंदर आणि तेजस्वी दिसायचं असेल तर, मुलेठीचा वापर करा. पण त्वचेसाठी मुलेठीचा वापर नेमका करावा कसा? यामुळे त्वचेला फायदा होतो का?(Mulethi Benefits for Skin Care).

मुलेठीचे त्वचेला होणारे फायदे

- त्वचेसाठी मुलेठीचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे त्वचा उजळ आणि तेजस्वी दिसते. त्वचेवर मुलेठीचा वापर केल्याने लालसरपणा, सूज आणि मुरुमांचे डाग दूर होतात. मुलेठीमधील अँटिऑक्सिडंट्स प्रदूषण आणि अतिनील किरणांमुळे त्वचेचे होणाऱ्या नुकसानापासून सरंक्षण करते.

टवटवीत त्वचेसाठी मुलेठी फेसपॅक

Diwali : तेलकट - मेणचट जुने दिवे कसे स्वच्छ करावे? ३ टिप्स; मिनिटांत दिवे चकाचक

मुलेठी

मध

गुलाब पाणी

एका भांड्यात मुलेठी पावडर घ्या. त्यात मध मिक्स करा. गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात गुलाबजल मिक्स करा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५ - २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक त्वचेचा टोन सुधारण्यास आणि इतर डाग काढण्यास मदत करते.

मुलेठी आणि दह्याचा फेसपॅक

मुलेठी पावडर

दही

हळद

एका बाऊलमध्ये चमचाभर मुलेठी पावडर, दही आणि हळद घ्या. गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ - २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. २० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याला पोषण मिळेल. आणि चेहरा उजळ करण्यास मदत होईल.

मुलेठी आणि लिंबाचा फेसपॅक

मुलेठी पावडर

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

लिंबाचा रस

गुलाबजल

एका बाऊलमध्ये मुलेठी पावडर घ्या. त्यात लिंबाचा रस आणि गुलाबजल घालून मिक्स करा. गुळगुळीत पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. या फेसपॅकमुळे चेहरा चमकेल. 

टॅग्स :दिवाळी 2024त्वचेची काळजीब्यूटी टिप्स