Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर टॅनिंग आलंय-हात-पायही काळवंडले? मुल्तानी माती 'अशी' लावा; ग्लो येईल-टॅनिंग निघेल

चेहऱ्यावर टॅनिंग आलंय-हात-पायही काळवंडले? मुल्तानी माती 'अशी' लावा; ग्लो येईल-टॅनिंग निघेल

Multani Matti For Face :  डाग -एक्ने दूर करण्यासाठी तुम्ही मुल्तानी मातीपासून तयार झालेल्या फेसपॅकचा वापर करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 02:30 PM2024-03-17T14:30:37+5:302024-03-17T17:26:48+5:30

Multani Matti For Face :  डाग -एक्ने दूर करण्यासाठी तुम्ही मुल्तानी मातीपासून तयार झालेल्या फेसपॅकचा वापर करू शकतात.

Multani Matti For Face : How To Remove Sun Tan From Face Home remedies For Tanning Removal | चेहऱ्यावर टॅनिंग आलंय-हात-पायही काळवंडले? मुल्तानी माती 'अशी' लावा; ग्लो येईल-टॅनिंग निघेल

चेहऱ्यावर टॅनिंग आलंय-हात-पायही काळवंडले? मुल्तानी माती 'अशी' लावा; ग्लो येईल-टॅनिंग निघेल

आजकाल तरूण तरूणी हेल्दी स्किन मिळवण्यासाठी खूप काही करतात. (Skin Care Tips) महागड्या ट्रिटमेंट्सही घेतात. काहीवेळानंतर चेहऱ्यावर एजिंग साईन्स येतात.  (Benefits Of Multani Mati For Skin) काही स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर न करता तुम्ही नॅच्युरल इंग्रेडिएट्सचा वापर करून ग्लोईंग स्किन मिळवू शकता.  केमिकल्सयुक्त क्रिम्सच्या वापरामुळे चेहरा खराब होऊ शकतो. त्यापेक्षा मुल्तानी मातीचा फेसपॅक तुमचा चेहरा उजळवण्यासाठी उत्तम ठरतो. (Effective Ways To Use Multani Matti For Face)

सोशल मीडिया युजर रोहिणी डांन्स, आर्टिस्ट आणि युट्युबर आहेत. आपल्या चॅनेलवर त्या वेगवेगळे उपाय शेअर करत असतात. त्यांनी मुल्तानी मातीचा चेहऱ्यावर कसा वापर करता येईल याबाबत अधिक माहिती  दिली आहे. डाग -एक्ने दूर करण्यासाठी तुम्ही मुल्तानी मातीपासून तयार झालेल्या फेसपॅकचा वापर करू शकतात. आठवड्यातून २ वेळा मुल्तानी मातीचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर  ग्लो येतो आणि  त्वचा ग्लोईंग दिसते.  रोहिणी यांनी सांगितले की हा फेस पॅक लावल्याने डाग आधीपेक्षा कमी झाले आहेत. 

मुल्तानी मातीने चेहऱ्यावरचे डाग कसे काढून टाकावेत? (How to Remove Pimples From Face)

मुल्तानी मातीच्या पावडरमध्ये एलोवेरा जेल मिसळा. त्यात मलई, हळद आणि दूध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवा आणि थोड्यावेळासाठी सुकू द्या. अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. चेहऱ्यावर फेस वॉश अप्लाय करा.

त्वचेसाठी मुल्तानी मातीचे फायदे (Benefits Of Multani Mitti)

मुल्तानी माती लावल्याने चेहऱ्यावर  डेड स्किन सेल्स दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा चमकदारही दिसते. मुल्तानी माती लावल्याने त्वचेतील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. त्वचा ताजीतवानी दिसते. म्हणूनच मुल्तानी मातीचा उपयोग फायदेशीर ठरतो.  मुल्तानी मातीत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे चेहऱ्याचं इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. 

टॅनिंग काढून टाकण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर कसा करावा? (How to Remove Face Tan Using Multani Mitti)

टॅनिंग घालवण्यासाठी तुम्ही मुल्तानी मातीत लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावू सकता. यासाठी २ चमचे मुल्तानी माती घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि गुलाब पाण्याचे काही थेंब मिसळा. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावा आणि सुकू द्या. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.  ज्यामुळे त्वचेचं सौंदर्य खुलण्यात मदत होईल.

Web Title: Multani Matti For Face : How To Remove Sun Tan From Face Home remedies For Tanning Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.