Join us  

चेहरा काळा पडलाय? २ चमचे मुलतानी माती देईल पार्लर फेशियलचा ग्लो, सोप्या फेशियल स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 5:27 PM

Multani Mitti Facial at Home : मुलतानी मातीचा वापर करून तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. जर तुम्हाला पार्लरचं महगडं फेशियल करायचं नसेल तर तुम्ही ३ स्टेप्सच्या मदतीनं घरीच फेशियल करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कधी त्वचा काळी पडते तर कधी पिंपल्स येतात. (How to do fecial at  home)त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि तेलाचा समावेश करू शकता. यामुळे ऑयली पोर्स बंद राहतात आणि त्वचेचा रंग, पोत सुधारण्यात मदत होते. (Simple Homemade Face Pack)

मुलतानी मातीचा वापर करून तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. जर तुम्हाला पार्लरचं महगडं फेशियल करायचं नसेल तर तुम्ही ३ स्टेप्सच्या मदतीनं घरीच फेशियल करू शकता. चांगला इफेक्ट मिळवण्यासाठी तुम्ही १५ दिवसातून एकदा हे फेशियल करायला हवं. (Simple Homemade Face Pack Using Multani Mitti fecial steps at home)

क्लिंजिंग 

फेशियलची सगळ्यात महत्वाची पायरी आहे क्लिजिंग. मुलतानी माती एक छोटा चमचा घ्या. अर्धा चमचा चंदन पावडर घ्या. दोन्ही गोष्टी नीट मिसळा. त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर पातळ थर लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ पुसून घ्या.

केस पातळ झाले? १ चमचा नारळाचं तेल अन् एलोवेरा; घरी करा खास सिरम, भराभर वाढतील केस

एक्सफोलिएशन

कच्च दूध २ चमचे, संत्र्याच्या सालांची पावडर २ चमचे घेऊन एकत्र करा. कच्च दूध आणि संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. नंतर एका कॉटन बॉलच्या मदतीनं क्लॉकवाईज आणि एंटीक्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ५ मिनिटांसाठी मसाज करा. ५ मिनिटं चेहऱ्यावर हे मिश्रण लावल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

फेस पॅक

फेशियलची पुढची आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे चेहऱ्याला फेस पॅक लावा. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला मोजकं साहित्य घ्यावं लागेल. १ चमचे मुलतानी माती, १ चमचा चंदन पावडर , आवश्यकतेनुसार टोमॅटोचा रस घेऊन हे मिश्रण एकत्र करा.

एका भांड्यात मुलतानी माती पावडर आणि चंदन पावडर मिक्स करा. गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत त्यात टोमॅटोचा पुरेसा रस घाला. पॅक आता तयार आहे.  पॅकचा एक समान थर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. आपला चेहरा कोरडा करा. अशा रितीनं तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं फेशियल करू शकता. 

टॅग्स :आरोग्यब्यूटी टिप्सत्वचेची काळजी