Lokmat Sakhi >Beauty > धुतल्यानंतर केस गळतात - शेपटीगत दिसतात? शाम्पूमध्ये घाला १ खास माती; केसांची चमक वाढेल

धुतल्यानंतर केस गळतात - शेपटीगत दिसतात? शाम्पूमध्ये घाला १ खास माती; केसांची चमक वाढेल

Multani Mitti for Hair: Benefits, Hair Packs & Uses : केस धुताना शाम्पूमध्ये एक माती घाला; केस होतील दाट - दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 09:00 AM2024-07-22T09:00:00+5:302024-07-22T09:00:01+5:30

Multani Mitti for Hair: Benefits, Hair Packs & Uses : केस धुताना शाम्पूमध्ये एक माती घाला; केस होतील दाट - दिसतील सुंदर

Multani Mitti for Hair: Benefits, Hair Packs & Uses | धुतल्यानंतर केस गळतात - शेपटीगत दिसतात? शाम्पूमध्ये घाला १ खास माती; केसांची चमक वाढेल

धुतल्यानंतर केस गळतात - शेपटीगत दिसतात? शाम्पूमध्ये घाला १ खास माती; केसांची चमक वाढेल

भारतात हजारो वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर स्किनसाठी केला जात आहे (Hair care tips). याचा फायदा त्वचेला तर होतोच, पण कधी केसांसाठी याचा वापर करून पाहिलं आहे का? केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण केमिकल बेस्ड हेअर केअर प्रॉडक्ट्सचा वापर करीत आलो आहोत (Multaani maati). पण यामुळे केसांचे अधिक नुकसान होते.

केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे या समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा केस धुताना गळतात. जर आपण देखील या समस्येपासून त्रस्त असाल तर, शाम्पूमध्ये मुलतानी माती मिसळून केस धुवा. यामुळे नक्कीच फरक पडेल(Multani Mitti for Hair: Benefits, Hair Packs & Uses).

केसांसाठी मुलतानी मातीचे फायदे

त्वचा उजळ करण्यासोबत मुलतानी माती केसांसाठीही फायदेशीर ठरते. या मातीत पुष्कळ प्रमाणात अॅल्युमिनियम सिलिकेट आढळून येते. ज्यामुळे स्काल्प कायम हेल्दी राहते. यात असलेले चुन्याचे घटक नुकसानकारक बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ काढून टाकण्यासही मदत करते. स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर करू शकता.

जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी

केसांसाठी मुलतानी मातीचा वापर कसा करावा?

- केस धुण्यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर करू शकता. यासाठी केस आधी पाण्याने धुवून घ्या.

- एका बाऊलमध्ये एक चमचा शाम्पू घ्या, त्यात एक चमचा मुलतानी माती पावडर मिसळून पेस्ट तयार करा.

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? पाहा, कानात मळ झाला तर काय करायचे

- तयार पेस्ट स्काल्प आणि केसांच्या टोकापर्यंत लावून घासा.

- काही वेळानंतर पाण्याने केस धुवा. आपण मुलतानी मातीने केस आठवड्यातून २ वेळा धुवू शकता.

Web Title: Multani Mitti for Hair: Benefits, Hair Packs & Uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.