Lokmat Sakhi >Beauty > ओपन पोर्स कमीच होतं नाही, चेहऱ्यावर छिद्रं दिसतात? 'या' मातीत मिसळा २ गोष्टी; पाहा बदल

ओपन पोर्स कमीच होतं नाही, चेहऱ्यावर छिद्रं दिसतात? 'या' मातीत मिसळा २ गोष्टी; पाहा बदल

Multani Mitti For Open Pores - Benefits & DIY Recipe : ओपन पोर्स ते टॅनिंग; चेहऱ्यावर कशापद्धतीने मुलतानी मातीचा वापर करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2024 10:00 AM2024-04-13T10:00:50+5:302024-04-14T10:38:37+5:30

Multani Mitti For Open Pores - Benefits & DIY Recipe : ओपन पोर्स ते टॅनिंग; चेहऱ्यावर कशापद्धतीने मुलतानी मातीचा वापर करावा?

Multani Mitti For Open Pores - Benefits & DIY Recipe | ओपन पोर्स कमीच होतं नाही, चेहऱ्यावर छिद्रं दिसतात? 'या' मातीत मिसळा २ गोष्टी; पाहा बदल

ओपन पोर्स कमीच होतं नाही, चेहऱ्यावर छिद्रं दिसतात? 'या' मातीत मिसळा २ गोष्टी; पाहा बदल

त्वचा म्हटली की त्याच्यासंबंधित समस्या येणारच. त्वचेमध्ये देखील अनेक प्रकार असतात (Skin Care Tips). तेलकट असो किंवा ड्राय, त्वचेच्या प्रकारानुसार त्याच्या संबंधित समस्याही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात (Open Pores). वयानुसार त्वचेच्या समस्या वाढतात, आणि या समस्या सोडवणं कधी-कधी कठीण वाटतं (Multaani Mitti). त्वचेवर सतत मुरुम, पुटकुळ्या येणे, त्वचेचा पोत बिघडणे, यामुळे स्किनवर पोर्स देखील निर्माण होतात.

ओपन पोर्स हे विशेषतः नाक, कपाळ, डोळ्यांखाली, गालांवर किंवा हनुवटीवर दिसतात. जे मेकअप करूनही झाकले जात नाही. जर आपण देखील ओपन पोर्समुळे त्रस्त असाल तर, मुलतानी मातीचा नैसर्गिक उपाय करून पाहा. मुलतानी मातीच्या फेसपॅकमुळे त्वचा डागरहित होते. त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. शिवाय ओपन पोर्समधील घाण काढून क्लिन करते. पण चेहऱ्यावर मुलतानी मातीचा वापर कसा करावा? पाहूयात(Multani Mitti For Open Pores - Benefits & DIY Recipe).

ओपन पोर्सवर मुलतानी मातीचा उपाय

लागणारं साहित्य

केस धुतले की फरशीवर केसच केस? शाम्पूमध्ये मिसळा १ नैसर्गिक जेल; केस होतील घनदाट-करतील शाईन

मुलतानी माती

लिंबाचा रस

दही

या पद्धतीने तयार करा फेसपॅक

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चमचाभर दही घालून मिक्स करा. तयार पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

चेहरा चांदीसारखा चमकेल-टॅनही होईल गायब, फक्त दह्यात मिसळून १ रस लावा! पाहा तेज

आता चेहऱ्यावर ब्रश किंवा बोटाने पेस्ट घेऊन लावा. पेस्ट लावल्यानंतर चेहरा १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून एक वेळा करू शकता. यामुळे स्किन क्लिन होईल. पोर्समधील घाण निघून जाईल. शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.

चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याचे अनेक फायदे आहेत. मुलतानी माती ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकेटने समृद्ध आहे. शिवाय त्यात अधिक प्रमाणात हर्बल गुणधर्म असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. मुलतानी मातीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात. ज्यामुळे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स कमी करतात, आणि त्वचेचे छिद्र बंद करतात.

Web Title: Multani Mitti For Open Pores - Benefits & DIY Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.