Lokmat Sakhi >Beauty > चेहरा काळपट झालाय? मुलतानी मातीत हा पदार्थ मिसळून लावा; फेशियलचा ग्लो घरीच मिळेल

चेहरा काळपट झालाय? मुलतानी मातीत हा पदार्थ मिसळून लावा; फेशियलचा ग्लो घरीच मिळेल

Multani Mitti Skin Care Tips : पूर्वापार या मातीचा वापर स्किन उजळवण्यासाठी केला जात आहे. मुलतानी मातीाच स्क्रब चेहरा उजळवण्यासाठी आणि त्वचा चमकदार होण्यासाठी केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:21 PM2023-06-08T19:21:06+5:302023-06-08T19:36:36+5:30

Multani Mitti Skin Care Tips : पूर्वापार या मातीचा वापर स्किन उजळवण्यासाठी केला जात आहे. मुलतानी मातीाच स्क्रब चेहरा उजळवण्यासाठी आणि त्वचा चमकदार होण्यासाठी केला जातो.

Multani Mitti Skin Care Tips : Benefits of Multani Mitti Face Pack For Your Skin Problems | चेहरा काळपट झालाय? मुलतानी मातीत हा पदार्थ मिसळून लावा; फेशियलचा ग्लो घरीच मिळेल

चेहरा काळपट झालाय? मुलतानी मातीत हा पदार्थ मिसळून लावा; फेशियलचा ग्लो घरीच मिळेल

वाढत्या गरमीच्या वातावरणात चेहरा टॅन होऊ लागतो आणि डल दिसतो. उन्हाळ्याच्या  दिवसात अनेकदा सनस्क्रीन लावूनही चेहरा काळा पडायचा थांबत नाही. (Easy Ways to Use Multani Mitti For Glowing Skin) चेहरा काळा पडू नये यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. गरमीच्या दिवसात त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. मुलतानी मातीच्या स्क्रबनं तुम्ही चेहरा उजळवू शकता. मुल्तानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. (Multani Mitti Skin Care Tips)

पूर्वापार या मातीचा वापर स्किन उजळवण्यासाठी केला जात आहे. मुलतानी मातीाच स्क्रब चेहरा उजळवण्यासाठी आणि त्वचा चमकदार होण्यासाठी केला जातो. या मातीच्या वापरानं डेड स्किन निघून त्वचा त्वचेचा रंगही उजळतो.  नारळाचं तेल ऑयली स्किन आणि पोषण मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. (The Skin Benefits of Multani Mitti Clay)

मुलतानी मातीचा फेस स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बाऊल घ्या. त्यात २ चमचे मुलतानी माती आणि १ चमचा नारळाचं तेल घाला. यासह त्यात २ चमचे साखर घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. तयार आहे मुलतानी मातीचा स्क्रब. हे स्क्रब तुम्ही कोणत्याही वेळी चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छ करून शकता. 

मुलतानी माती स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर तुम्ही तयार केलेला स्क्रब तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.सुमारे 10-15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर तुम्ही हलक्या हातांनी स्क्रब करून चेहरा स्वच्छ करा. यानंतर, सामान्य पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर क्रीम किंवा लोशन लावावे.

मुलतानी माती आणि मध

चेहऱ्यावरील फोड आणि पिंपल्स दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा हा फेस पॅक बनवा आणि लावा. भिजवलेली मुलतानी माती एका भांड्यात घ्या आणि त्यात मध आणि हळद घाला. चेहरा धुतल्यानंतर हा फेस पॅक लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा.

कडुलिंबाची पावडर

एक वाडगा घ्या आणि त्यात २ चमचे मुलतानी माती आणि एक चमचा कडुलिंबाची पावडर मिक्स करा. मिक्स करण्यासाठी लिंबाचा रस घाला आणि थोडे पाणी घाला. यानंतर हा पॅक काही वेळ तसाच ठेवा आणि पॅक सुकल्यावर हलक्या हातांनी चोळून चेहरा धुवा. या उपायानं त्वचा चमकदार होईल आणि पिंपल्स देखील निघून जातील.

Web Title: Multani Mitti Skin Care Tips : Benefits of Multani Mitti Face Pack For Your Skin Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.