Join us  

केसांची शेपटी झाली? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-लांबसडक होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 8:38 AM

Mustard Oil And Kapoor For Hairs Hair Care Tips : मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यानं केस लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल.

मुली केसांना काळे, दाट बनवण्यासाठी नेहमीच ट्रिटमेंट घेत असतात. जेणेकरून केसांचे सौंदर्य टिकून राहील. कारण यात निष्काळजीपणा केल्यास केसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांची चमक परत आणू शकता. ज्यामुळे केस सुंदर आणि दाट दिसतील. मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यानं केस लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल. (How To Use Mustard Oil For Hairs)

मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यानं केसांना काय फायदे मिळतात

१) कापूराचे तेल वेगवेगळ्या प्रकार वापरले जाते. यात मुख्य स्वरूपात जळजळ, खाज, वेदना आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो याव्यतिरिक्त केसांसाठीसुद्धा उत्तम मानले जाते. 

२) जर तुम्ही मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावाल तर केसांचं गळणं, केसांना फाटे फुटणं थांबवता येतं, याशिवाय केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवत नाही.

३) मोहोरीच्या तेलात कापूर मिसळून तळव्यांना लावल्यानं डोळे चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. कंबरेच्या वेदना औषधी तेलानं कमी होतात. याशिवाय शरीराचा त्रास दूर होण्यास मदत होते.

वरण-भातावर 'हा' पदार्थ घालून खा; रोजचं साधं वरण होईल अमृतासमान, थकवा-कमजोरी होईल दूर

४) आर्थरायटिसची समस्या उद्भवल्यास तुम्ही या मिश्रणाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. मोहोरीचे तेल आणि कापूर या दोन्हींमध्ये एंटी फंगल, एंटी ऑक्सिडेंटस आणि फॅटी एसिड्स असतात म्हणूनच केस, डोळे, स्किन चांगली राहण्यास मदत होते. 

५) मोहोरी आणि कापूराचे तेल बनवण्यासाठी २ ते ३ चमचे मोहोरीच्या तेलात १ ते २ कापूराचे तुकडे घाला. नंतर पुन्हा गरम करा जेव्हा कापूर तेलात मिसळेल तेव्हा थंड होण्यास ठेवा. नंतर प्रभावित ठिकाणी ते लावा. 

मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, दाट केसांचं सिक्रेट

केसांचे गळणं कमी करण्यासाठी मोहोरीचे तेल फायदेशीर ठरते. मोहोरीच्या तेलानं स्काल्पची मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त मोहोरीच्या तेलात अशी काही पोषक तत्व असतात ज्यामुळे केस मुळापासून मजबूत राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात.

मोहोरीचे तेल पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी एसिड्स, नियासिन, सेलेनियम  आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. मोहोरीच्या तेलानं केसांची मसाज केल्यास पातळ केसांची समस्या उद्भवत नाही. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल