Join us  

कमी वयात केस गळतात? पांढरेही झालेत? मोहरीच्या तेलात घाला २ पाने; भरभर वाढतील केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 5:59 PM

Mustard Oil for Hair Growth : केस इतके गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? घरात तयार करा पॉवरफुल अँटी हेअर फॉल

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे फक्त गंभीर आजारांचा धोका वाढत नसून, त्वचा आणि केसांच्या निगडित देखील समस्या वाढत जातात (Hair Growth). शरीराला पुरेसं पोषण मिळालं नाही, की केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा यासह इतर समस्यांमुळे केस अधिक खराब होतात (Hair loss Remedy). यावर उपाय म्हणून आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. पण रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती तेलाचा वापर करू शकता.

मोहरीच्या तेलात २ पाने घालून उकळवा. या घरगुती तेलामुळे केसांना आयुर्वेदिक घटक मिळतील. ज्यामुळे केसगळती थांबेल. पण पॉवरफुल अँटी हेअर फॉल ऑईल कसे तयार करायचे? केसांवर या तेलाचा वापर कसा करावा? या तेलामुळे खर्च केस गळती थांबेल का? पाहूयात(Mustard Oil for Hair Growth).

पॉवरफुल अँटी हेअर फॉल तेल करण्यासाठी लागणारं साहित्य

मोहरीचं तेल 

जास्वंदाची पानं 

कडीपत्त्याची पानं

कांदा 

मेथी दाणे 

अशा पद्धतीने तयार करा अँटी हेअर फॉल तेल

सर्वप्रथम, लोखंडी कढईत एक कप मोहरीचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात ४ ते ५ जास्वंदाची पानं, कडीपत्त्याची पानं, एक उभा चिरलेला कांदा, एक टेबलस्पून मेथी दाणे घालून मिक्स करा.

साहित्य मिक्स केल्यानंतर १० मिनिटांसाठी लो फ्लेम साहित्य तेलात शिजवून घ्या. १० मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात २ व्हिटॅमिन ई कॅपस्युल घालून मिक्स करा. आता एका वाटीवर चहाची गाळणी ठेवा, त्यात साहित्य गाळून तेल वेगळे करा. अशा प्रकारे अँटी हेअर फॉल ऑईल केसांच्या वापरण्यासाठी रेडी.

केसांवर तेलाचा वापर कसा करावा?

या तेलाचा वापर करण्यासाठी केस विंचरून घ्या. नंतर केसांचा भांग पाडून बोटांनी तेल लावा. स्काल्पपासून ते केसांच्या टोकापर्यंत तेल लावून मसाज करा. ३ ते ४ तासानंतर केस शाम्पूने धुवून घ्या.

केसांसाठी मोहरीचे तेलाचे फायदे

कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक

केसांसाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. त्यातील गुणधर्म केसांच्या समस्या दूर करतात. त्यात अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूवर असलेले हानिकारक बॅक्टेरिया निघतात. शिवाय कोंडा काढून टाकण्यास मदत होते. यासह त्यात अल्फा फॅटी ॲसिड असते जे केसांना ओलावा पुरवतात.

जास्वंदाची पाने

केसांना जास्वंदाची फुलं फायदेशीर ठरते. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे मेलेनिन तयार होते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी देखील असते. ज्यामुळे केसांची मुळं बळकट होतात, आणि केसगळती थांबते.

१० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

कडीपत्त्याची पानं

कडीपत्त्याची पानं फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यात अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे काही समृद्ध पोषक असतात. जे केसांसाठी विविध प्रकारे काम करतात. शिवाय त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स