Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा २ घरगुती गोष्टी; आजीच्या पोटलीतला खास उपाय

खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा २ घरगुती गोष्टी; आजीच्या पोटलीतला खास उपाय

My Grandma's Hair Tonic for Extreme Hair Growth; How to use coconut oil for hair growth : लांबसडक केस हवेत तर करा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 10:00 AM2024-08-07T10:00:30+5:302024-08-07T11:05:59+5:30

My Grandma's Hair Tonic for Extreme Hair Growth; How to use coconut oil for hair growth : लांबसडक केस हवेत तर करा खास उपाय

My Grandma's Hair Tonic for Extreme Hair Growth; How to use coconut oil for hair growth | खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा २ घरगुती गोष्टी; आजीच्या पोटलीतला खास उपाय

खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा २ घरगुती गोष्टी; आजीच्या पोटलीतला खास उपाय

आजकाल प्रत्येक व्यक्ती केस गळतीमुळे त्रस्त आहे (Hair Growth). याशिवाय केस पांढरे होणे, केसात कोंडा, केस निर्जीव होणे या समस्येमुळे टक्कल पडण्याची भीतीही वाटते (Coconut oil for Hairs). यावर उपाय शोधण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरला जातो. पण बऱ्याचदा ब्यूटी ट्रिटमेण्टमुळे केस आणखीन खराब होऊ शकतात (Hair Fall Problem). केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण वर्षानुवर्ष खोबरेल तेल वापरत आलो आहोत.

खोबरेल तेलातील गुणधर्म केसांच्या वाढीस मदत करतात. शिवाय स्काल्पचेही रक्षणही करते. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे केस फार गळतात. केस गळतीमुळे आपणही त्रस्त असाल तर, खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून केसांना लावा. केस गळतीपासून सुटका होईल. स्काल्पही निरोगी राहील(My Grandma's Hair Tonic for Extreme Hair Growth; How to use coconut oil for hair growth).

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलाचा करा 'असा' वापर

लागणारं साहित्य

खोबरेल तेल

एलोवेरा जेल

केसांचा भांग रुंद, पांढरे केस झाले? होमिओपॅथी तज्ज्ञांनी सांगितलं खोबरेल तेलाचा 'असरदार' उपाय

एरंडेल तेल

अशा प्रकारे तयार करा अँटी हेअर फॉल ऑइल

र्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. डबल बॉयलर पद्धतीने आपल्याला अँटी हेअर फॉल ऑइल तयार करायचं आहे. एका बाऊलमध्ये २ चमचे खोबरेल तेल घ्या. आपण आपल्याला केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घेऊ शकता.

चिमटीने वाटी पकडा, व उकळत्या पाण्यावर ठेवा. खोबरेल तेल थोडं कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. कोरफड जेल मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घालून मिक्स करा, आणि गॅस बंद करा.

डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे तेज कमी झाले? चमचाभर कॉफीचा सोपा उपाय - १० मिनिटात दिसेल फरक

अशा पद्धतीने अँटी हेअर फॉल ऑइल वापरण्यासाठी रेडी. आपण या तेलाचा वापर स्काल्पवर करू शकता, केसांच्या टोकापर्यंत हे तेल लावा, आणि हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. काही वेळानंतर केस शाम्पूने धुवा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

केसांसाठी एरंडेल तेलाचे फायदे 
केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरते. एरंडेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खोबरेल तेलात आपण एरंडेल तेल केसांना लावू शकता. यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील.

Web Title: My Grandma's Hair Tonic for Extreme Hair Growth; How to use coconut oil for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.