केस पातळ (Hair fall) होण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे(Hair care Tips). प्रत्येक वेळी केस विंचरताना ते एवढे गळतात की ते प्रमाण पाहून आपल्याला लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते (Hair Growth). असं होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे केसांना पुरेसं पोषण न मिळणं. केसांना पोषण हे खाण्यातून किंवा तेलातून मिळते.
खाण्यातून योग्य पोषण मिळत असेल तर, केसांना योग्य पद्धतीने तेल लावायला हवे. केसांना आठवड्यातून २ वेळा तेल लावून मसाज करायला हवे. यामुळे केसांची मुळं पक्की होतात. केस गळती होत नाही. शिवाय मुळापासून केस तुटण्याची समस्याही कमी होते. जर आपणही केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, खोबरेल तेलातून होममेड तेल तयार करा. केस गळती थांबेल(My SECRET Homemade Hair oil For Long & Healthy Hairs).
होममेड हेअर ऑइल करण्यासाठी लागणारं साहित्य
खोबरेल तेल
कडीपत्ता
कांदा
आलं
कोरफड जेल
केसांना मेहेंदी लावल्यावर लाल रंग चढतो? त्यात मिसळा 'ही' १० रुपयांची पावडर; शायनी केस हवेत तर..
कलौंजी
मेथी दाणे
कृती
सर्व प्रथम एक मोठी लोखंडी कढई घ्या. त्यात खोबरेल तेल घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. खोबरेल तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता, कांदा, आले, एलोवेरा जेल, चहापत्ती, मेथी दाणे घालून मिक्स करा. साहित्य तेलात शिजल्यानंतर गॅस बंद करा.
भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल
तेल कोमट झाल्यानंतर एका बाटलीवर चाळणी ठेवा. त्यात तेल ओतून गाळून घ्या. आणि तयार तेल केसांना लावून मसाज करा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे नक्कीच केसांची योग्य वाढ होईल.