Lokmat Sakhi >Beauty > पाळीच्या  ४ दिवसात केस धुवावेत का, केस धुतल्यास काय होतं? हे आहे खरं कारण

पाळीच्या  ४ दिवसात केस धुवावेत का, केस धुतल्यास काय होतं? हे आहे खरं कारण

Is it true that a girl should not wash her hair during periods : वैज्ञानिकदृष्ट्या याला कोणताही आधार नाही. पूर्वीच्या काळी लोक नदीचे पाणी पिण्यासाठी देखील वापरत असल्याने, मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 07:00 PM2023-01-29T19:00:10+5:302023-01-29T19:04:59+5:30

Is it true that a girl should not wash her hair during periods : वैज्ञानिकदृष्ट्या याला कोणताही आधार नाही. पूर्वीच्या काळी लोक नदीचे पाणी पिण्यासाठी देखील वापरत असल्याने, मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

Myth: Washing hair on your periods can make you infertile | पाळीच्या  ४ दिवसात केस धुवावेत का, केस धुतल्यास काय होतं? हे आहे खरं कारण

पाळीच्या  ४ दिवसात केस धुवावेत का, केस धुतल्यास काय होतं? हे आहे खरं कारण

पीरियड्स हा आजच्या काळातला असा विषय आहे, ज्यावर लोक अजूनही उघडपणे बोलणे पसंत करत नाहीत. त्यामुळे आजही अनेकांच्या मनात पीरियड्सबाबत अनेक प्रकारचे गोंधळ असतात. आजच्या युगातही लोक जुन्या काळातील समजुती पाळत आहेत, ज्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, जसे की पीरियड्समध्ये लोणच्याला हात लावल्याने लोणचे खराब होते, पीरियड्सच्या काळात किचनमध्ये जाऊ नये इ. असाच आणखी एक समज देशाच्या काही भागांमध्ये प्रचलित आहे की मासिक पाळी दरम्यान केस धुवू नयेत. (Myth: Washing hair on your periods can make you infertile)

यापैकी एक असा दावा आहे की, “पीरियड्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केस धुतले जाऊ नयेत कारण या दिवसांमध्ये महिलांच्या शरीराचे तापमान खूप जास्त असते. अशा परिस्थितीत महिलांनी केस  धुतले तर शरीराचे तापमान कमी होते, त्यामुळे रक्तस्त्राव नीट होत नाही. अशा स्थितीत महिलांमध्ये अंतर्गत अनेक प्रकारच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. (Can you wash your hair on your periods?)

मासिक पाळीत केस धुवू नयेत, हा अनादी काळापासून चालत आलेल्या समजुतींमध्ये समाविष्ट आहे. जुन्या काळात अनेक प्रकारच्या गैरसोयी होत्या, जसे की महिलांना आंघोळीसाठी नदी, तलाव किंवा उघड्यावर जावं लागायचं. अशा स्थितीत महिलांना मासिक पाळीच्या काळात घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती.  जेणेकरून त्यांना या काळात शारीरिक त्रास होऊ नये. त्यामुळेच त्यांना मासिक पाळी दरम्यान केस न धुण्यास सांगण्यात आले होते. हे केवळ महिलांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले होते.

वैज्ञानिकदृष्ट्या याला कोणताही आधार नाही. पूर्वीच्या काळी लोक नदीचे पाणी पिण्यासाठी देखील वापरत असल्याने, मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. वास्तविक, मासिक पाळीच्या वेळी रक्तामध्ये अनेक जीवाणू असतात, जे नदी किंवा तलावाचे पाणी दूषित करू शकतात.

मासिक पाळीच्या वेळी तुम्ही केस कधीही धुवू शकता. या दरम्यान आंघोळ केल्याने किंवा केस धुतल्याने महिलांना कोणताही त्रास होत नाही, उलट ते त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामुळे बॅक्टेरियाच्या समस्यांचा धोका कमी होतो. मासिक पाळीच्या काळात महिलांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

मासिक पाळीत केस धुण्याचे फायदे

१) शरीर निरोगी ठेवण्यासाठी मासिक पाळीत आंघोळ करणे आवश्यक आहे. यातून तुम्हाला काही फायदे मिळू शकतात.

२) मासिक पाळी दरम्यान शरीर निरोगी ठेवल्यास त्वचेवर जळजळ आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

३) केस धुतल्यानंतर आणि आंघोळ केल्यावर ताण-तणावमुक्त वाटते. हे तुमच्या ताणलेल्या स्नायूंना आराम देऊ शकते. यासोबतच, मासिक पाळीच्या दरम्यान जळजळ आणि इतर मासिक पाळीची लक्षणे जसे की डोकेदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.

Web Title: Myth: Washing hair on your periods can make you infertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.