- श्रावणी बॅनर्जी
मान्सून आला की तसे कपडे, तशा फॅशन्स. हिवाळा आला की बदला, उन्हाळा आला की बदला तो वॉर्डरोब. उन्हाळ्यात समर क्लोथ्स आणि फॅशन्सच हव्यात. पण एवढे पैसे प्रत्येक वेळेस आणणार कुठून? ते काही ब्युटी एक्सपर्ट सांगत नाहीत. पण आपल्याला जर कमी पैशात एकसे एक ट्रेण्डी प्रयोग करायचे असतील तर या घ्या काही सोप्या टिप्स.ऋतुमान आणि फॅशन यांचा मेळ घालून ट्रेण्डी तर राहायलाच हवे.मग आता या जरा उदास कोरोनाकाळात जेव्हा चेहऱ्यावर मास्क आलेला आहे तेव्हा ट्रेण्डी राहण्याचा एक एकदम सिम्पल फॉर्म्युला.- नेलपेण्ट!
तुम्हाला नेलपेण्ट आवडत असेल तर या येत्या उन्हाळ्यात तुम्ही सगळ्यात ट्रेण्डी दिसू शकता, सगळ्यात जास्त फॅशनेबलही ठरू शकता.नेहमीचेच कपडे, नेहमीचाच अवतार, मात्र एका नेलपेण्टने तुमचा मूड सहज बदलू शकतो.त्यासाठीच या काही एकदम सोप्या साध्या गोष्टी.१) ग्लिटर ही सध्या सगळ्यात भन्नाट गोष्ट. चमकिल्या चमकीवाल्या नेलपेण्ट. आपल्याला हव्या त्या ग्लिटरच्या रंगाची नेलपेण्ट बिंधास्त लावा. त्यातही गोल्डन, सिल्व्हर, ब्लॅक, निळा आणि जांभळा या रंगाचे ग्लिटर एकदम हटके दिसतात.२) एका बोटाच्या नखाला ग्लिटर एका नखाला ब्राईट पेस्टल कलर्स लावले तरी भन्नाट दिसतं.३) पिवळा, केशरी, निळा यासारखे वॉर्म पेस्टल कलर्स तर तुम्ही कधीही लावा.४) एक पिवळा, एक हिरवा, एक पेस्टल अशा शेड सांभाळत तुम्ही वेगवेगळ्या रंगांचं शेडिंगही करू शकता.
५) सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या नेलपेण्ट लावा. या मौसमात तुमचा मूड सुधारण्याचं काम त्या हमखास करतील!६. अजून एक महत्वाची ट्रिक म्हणजे हा रंग माझ्या हातावर कसा दिसेल, कुणी हसेल का, लोक काय म्हणतील याचा वचार न करता आता येत्या रंगपचंमी काळात आपल्या नखांवरही बहारदार रंग बसू द्या.७. नेलपेण्ट आपण लावू तशी, नेलआर्टचा इन्स्टा ट्रेण्ड अमूकच आहे, तमूकच लावा असं कुणी तुम्हाला सांगत असेल तर ते विसरुन जा, म्हणा ट्रेण्ड मुझसे शुरु होता है.८. फक्त नेलपेण्ट चांगल्या प्रतीची लावा. ९. रिमूव्हर लावूनच रंग बदला, खरवडू नका, त्यानं नखांना इजा होवू शकते.१०. एका नखावर किती रंग? या प्रश्नाचं उत्तर एकच, कितीही!