Lokmat Sakhi >Beauty > बदामाचे काजळ काय असते? विकतच्या काजळापेक्षा ते डोळ्यांसाठी चांगले की अपायकारक?

बदामाचे काजळ काय असते? विकतच्या काजळापेक्षा ते डोळ्यांसाठी चांगले की अपायकारक?

Natural Almond Kajal At Home : बदाम व तूपापासून बनविलेले घरगुती काजळ नैसर्गिक असून ते कोणत्याही प्रकारची हानी डोळ्यांना पोहोचवत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 03:50 PM2023-02-02T15:50:04+5:302023-02-02T16:01:14+5:30

Natural Almond Kajal At Home : बदाम व तूपापासून बनविलेले घरगुती काजळ नैसर्गिक असून ते कोणत्याही प्रकारची हानी डोळ्यांना पोहोचवत नाही.

Natural Almond Kajal At Home | बदामाचे काजळ काय असते? विकतच्या काजळापेक्षा ते डोळ्यांसाठी चांगले की अपायकारक?

बदामाचे काजळ काय असते? विकतच्या काजळापेक्षा ते डोळ्यांसाठी चांगले की अपायकारक?

आजकालच्या तरुणींच्या मेकअप किट मधील 'काजळ' हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्याला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुवा म्हणून आपण डोळ्यांकडे बघू शकतो. पण ते तितकेच नाजूक देखील आहेत, त्यामुळेच त्यांची देखभाल करणे देखील तितकेच आवश्यक आहे. डोळ्यांची सुंदरता जपणे आणि काळजी घेणे हे आपण न चुकता करतोच. अनेक महिला मेकअप करताना काजळाचा वापर आवर्जून करतात. आकर्षक डोळे दिसण्यासाठी महिला काजळ लावणं पसंत करतात.

सध्या बाजारांत विविध प्रकारची काजळ उपलब्ध असतात. बाजारामध्ये विकत मिळणाऱ्या या काजळांमध्ये भरपूर रासायनिक केमिकल्स मिसळलेले असतात. अश्या प्रकारचे काजळ डोळ्यांना लावले तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. यासाठी डोळे ताजेतवाने, पाणीदार राहण्यासाठी घरी बनवलेले काजळ केव्हाही उत्कृष्ट ठरु शकेल. जर आपल्याला काजळ लावायला आवडत असेल तर आपण घरी नैसर्गिक काजळ बनवू शकतो. घरगुती काजळ नैसर्गिक असून ते कोणत्याही प्रकारची हानी डोळ्यांना पोहोचवत नाही. सौंदर्य आणि डोळ्यांचं आरोग्य या दुहेरी फायद्यासाठी बदाम आणि साजूक तुपापासून डोळ्यांसाठी फायदेशीर असं काजळ तयार करता येतं(Natural Almond Kajal At Home).

साहित्य :-

१. बदाम :- ४ ते ५ 
२. तूप - १ टेबलस्पून 


बदामाचे काजळ बनविण्याची पद्धत :-
 
केमिकलयुक्त काजळ वापरल्यानं डोळ्यांना खाज येणं, डोळे लाल होणं, नजर कमी होणं एवढ्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. हे टाळण्यासाठी काजळ वापरु नये असं काहीवेळा सुचवलं जातं. बाहेरच्या केमिकलयुक्त काजळानं डोळ्यांचं सौंदर्य वाढत असलं तरी डोळ्यांचं आरोग्य मात्र धोक्यात येतं. डोळे सुरक्षित राखून डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी बदाम आणि साजूक तुपाचा वापर करुन घरच्याघरी काजळ तयार करता येतं.

१. सर्वप्रथम बदाम तुपामध्ये बुडवून घ्यावेत. 
२. आता हे तुपात बुडवून ठेवलेलं बदाम काटा चमच्याच्या टोकाला लावून घ्यावेत. 
३. आता गॅस पेटवून काटा चमच्याच्या मदतीने या बदामाचा रंग काळा होईपर्यंत संपूर्णपणे करपवून घ्यावेत. 
४. या करपवून घेतलेल्या बदामांची बारीक पूड करून घ्यावी. 
५. आता एका डबीमध्ये, ही बदामांची पूड भरून घ्यावी. त्यात अर्धा टेबलस्पून तूप घालून हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे. 
६. आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यांत भरून ठेवा. 

हे बदामापासून तयार झालेले काजळ आपल्याला हवे तेव्हा डोळ्यांत लावू शकता. 

influencedbyprabhkirat या इंस्टाग्राम पेजवरून डोळ्यांसाठी फायदेशीर असे बदामाचे काजळ कसे बनवावे याचे साहित्य व पद्धत शेअर करण्यात आले आहे. 


    

बदामाच्या काजळाचे फायदे :- 

१. बदामाचं काजळ डोळ्यांसाठी सुरक्षित असतं. बदामात अ आणि इ जीवनसत्व असतं. बदामाचं काजळ नियमित वापाल्यानं दृष्टी सुधारते.

२. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे शांत राहातात. डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांना खाज येणं, डोळे जळजळणं या समस्या दूर होतात. बदामाच्या काजळानं डोळ्यांना आराम मिळतो.

३. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे सुंदर दिसतात. पापण्यांचे केस वाढतात. डोळ्यांना छान चमक येते. घरी तयार केलेलं बदामाचं काजळ वापरल्यानं कोणतेही साइड इफेक्ट होत नाही.

घरगुती बदामाचे काजळ तयार करताना घ्यावयाची काळजी :-

१. हे काजळ तयार करताना शक्यतो घरी बनविलेल्या तूपाचा वापर करावा. 
२. बदाम संपूर्णपणे जळून काळे झाल्यावरच त्यांची एकदम बारीक पूड करावी. 
३. हे काजळ बनवून झाल्यावर व्यवस्थित एका डबीत स्टोअर करून ठेवून द्या.

Web Title: Natural Almond Kajal At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.