Join us  

चेहरा वयस्कर दिसतो? ३ पदार्थांचा घरगुती फेसपॅक लावा; सुरकुत्या, डार्क सर्कल्स येणारच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 10:12 AM

Natural Anti Aging Secrets : त्वचेची तरूणपणापासून काळजी घेतली तर वृद्धवाच्या खुणा वाढत्या वयात टाळता येऊ शकतात.  (How to prevent aging signs)

जसजसं वय वाढत जातं तसतसं चेहऱ्यावर सुरुकुत्या दिसायला सुरूवात होते. चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या वयस्करपणाचे लक्षण आहेत. (Skin Care  Tips) सुरकुत्या, डार्क सर्कल्स रोखण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत पण समस्या वाढल्यानंतर याचा काहीही उपयोग होत नाही. त्वचेची तरूणपणापासून काळजी घेतली तर वृद्धवाच्या खुणा वाढत्या वयात टाळता येऊ शकतात.  (How to prevent aging signs)

एंटी एजिंग गुणधर्म असलेले स्वयंपाकघरातले पदार्थ तुमची ही समस्या सोडवू शकतात. वयवाढीच्या खुणा टाळण्यासाठी एंटी  एजिंग फेसपॅक कसा बनवायचा हे पाहूया.  हा एंटी एजिंग पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी  ग्रीन टी चे २ पाऊच एका वाटीत रिकामे करून घ्या. त्यात एक चमचा हळद, २ चमचे दही घाला. हा पॅक एकत्र करा. (3 Anti ageing ingredients that can be easily found in your kitchen) या पॅकनं चेहऱ्याला आठवड्यातून २ वेळा मसाज करा.  यामुळे एक्ने, ओपन पोर्स, अकाली वृद्धत्व येणाची समस्या टाळता येईल. (Easiest way to reduce premature skin aging)

1) काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की ग्रीन टी किंवा ग्रीन टी अर्क त्वचेवर लावल्याने ती लवचिक बनते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

2) चेहऱ्यावर सनस्क्रीन लावूनही चेहरा टॅन होत असेल तर आंघोळीच्या पाण्यात चहाची पाने टाकून आंघोळ करावी. यामुळे तुम्हाला उन्हामुळे होणारी जळजळ, खाज इत्यादीपासून आराम मिळेल.

3) ग्रीन टी कंपाऊंड ECGC हे अँटी-एड्रेनर्जिक आहे जे तेल उत्पादन नियंत्रित करते. त्यामुळे त्वचेवरील तेलाचे प्रमाण कमी होते.

4)  ग्रीन टी मध्ये  व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 2 असते जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी 2 त्वचा तरुण आणि मजबूत ठेवण्यास मदत करते, तर व्हिटॅमिन ई त्वचेच्या नवीन पेशींच्या विकासास मदत करते. त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स