Lokmat Sakhi >Beauty > फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

Skin Care Tips: पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी अवघ्या १० रुपयांत ब्लीच (How to do bleach at home) करता येतं.. ते ही अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून. एकदा करून बघा हा प्रयोग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 08:41 PM2022-11-29T20:41:40+5:302022-11-29T20:42:16+5:30

Skin Care Tips: पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी अवघ्या १० रुपयांत ब्लीच (How to do bleach at home) करता येतं.. ते ही अगदी नैसर्गिक पदार्थ वापरून. एकदा करून बघा हा प्रयोग.

Natural bleach at home in just 10 Rs. How to do bleach at home? Homemade bleach | फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

Highlightsटॅनिंग कमी होऊन चेहरा उजळ, चमकदार व्हावा यासाठी घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने ब्लीच कसं करायचं, याची ही सोपी पद्धत.

सध्या लग्नसराई सुरू आहे. कामाच्या सगळ्या धावपळीत मग पार्लरमध्ये जायला वेळ मिळतच नाही. किंवा एरवीही घरातल्या, बाहेरच्या कामांच्या वेळा आणि पार्लरच्या वेळा यांचा मेळ जमत नाही आणि त्यामुळे मग पार्लरला जाणं होतच नाही. अशावेळी चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी असे काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. म्हणूनच चेहऱ्याचं टॅनिंग (tanning) कमी होऊन चेहरा उजळ, चमकदार व्हावा यासाठी घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने ब्लीच (Natural bleach at home in just 10 Rs) कसं करायचं, याची ही सोपी पद्धत. हा उपाय इन्स्टाग्रामच्या diy_queen_geet या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

घरच्याघरी ब्लीच कसं करायचं?
१. यासाठी आपल्याला अर्धा बटाटा, अर्धा टोमॅटो, अर्धे लिंबू, १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून बेसनपीठ आणि चिमुटभर हळद एवढं साहित्य लागणार आहे.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

२. सगळ्यात आधी बटाट्याची साले काढून घ्या आणि त्याचे बारीक काप करून घ्या. त्याचप्रमाणे टोमॅटोही बारीक चिरून घ्या.

३. आता मिक्सरच्या भांड्यात बटाट्याचे काप, टोमॅटोचे काप आणि अर्धे लिंबू सालासकट टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

 

४. ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. त्याचं जे पाणी निघेल त्यात तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाका.

५. त्यातच थोडी हळद टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. हा पॅक आता तुमच्या चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. त्यानंतर पॅक चेहऱ्यावर तसाच सुकू द्या.

फक्त १ पिन लावून ओढणीलाच बनवा स्टायलिश जॅकेट! बघा जॅकेटस्टाईल ओढणी घेण्याची हटके स्टाइल

६. त्यानंतर एका वाटीत कच्चे दूध घ्या. त्यात कापूस बुडवा आणि त्या कापसाने चेहरा चोळून चोळून स्वच्छ करा. 

७. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. अशा पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा घरच्याघरी ब्लीच केल्यास चेहरा तुकतुकीत दिसेल आणि टॅनिंग निघून जाईल. 

 

Web Title: Natural bleach at home in just 10 Rs. How to do bleach at home? Homemade bleach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.