Join us  

स्वच्छ नितळ त्वचेसाठी हवेत नॅचरल क्लीन्जर, क्लीन्जरचे 5 प्रकार- घरीही येतील बनवता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2022 2:01 PM

स्वच्छ नितळ त्वचेसाठी घरी तयार केलेले  नॅचरल क्लीन्जर वापरल्यास त्वचा होते नितळ आणि निरोगी.. नॅचरल क्लीन्जरचे 5 प्रकार सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त. 

ठळक मुद्देदूध आणि बेसनाचं क्लीन्जर तेलकट आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असतं.पायनापल क्लीन्जरमुळे त्वचा ताजीतवानी होते.संवेदनशील त्वचेची काळजी घेण्यासाठी मध आणि कोरफडचं क्लीन्जर रोज वापरावं.

त्वचेशी निगडित अनेक समस्यांचं मूळ त्वचेच्या अस्वच्छ्तेत असतं. त्वचा रोज मुळापासून स्वच्छ झाली तरच त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. त्वचेवर जमा झालेल्या धूळ, माती, तेल आणि घाम यामुळे त्वचेची रंध्रं बंद होतात आणि त्वचेचा श्वास कोंडतो. यासाठीच क्लीन्जरनं चेहरा स्वच्छ करणं आवश्यक असतं. क्लीन्जरचे विविध प्रकार मिळत असले तरी केमिकलयुक्त क्लीन्जरच्य वापरानं त्वचा खराब होते. त्वचेचं नुकसान न होऊ देता त्वच स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्लीन्जरची आवश्यकता असते. 5 प्रकारचे नैसर्गिक क्लीन्जर घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सहज तयार करता येतात. 

Image: Google

दूध आणि बेसन

दुधामुळे चेहरा माॅश्चराईज होतो तर बेसनामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. दूध आणि बेसनाने तयार होणाऱ्या क्लीन्जरमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. दूध आणि बेसनाचं क्लीन्जर कोरड्या आणि तेलकट अशा दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असतं. दूध आणि बेसनाचं क्लीन्जर करण्यासाठी 5-6 छोटे चमचे बेसन , 2 चमचे कच्चं दूध आणि 1 चमचा हळद घ्यावी. मिश्रण जास्त घट्ट आणि पातळ असू नये. हे मिश्रण चेहऱ्याला हलका मसाज करत लावावं आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवावा.

Image: Google

पायनापल क्लीन्जर

2 चमचे अननसाचा रस घ्यावा. त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालावा. घट्ट्सर पेस्ट तयार करण्यासाठी त्यात 1 चमचे बेकिंग सोडा घालावा. तिन्ही गोष्टी एकजीव करुन मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करत लावावं. 3-4 मिनिटं मसाज केल्यानंतर थंडं पाण्यानं चेहरा धुवावा. अननसात असलेल्या बेटा केरोटीनमुळे त्वचेच्या पेशी पुनरुज्जिवित होतात. तसेच यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. या क्लीन्जरमधील दाहविरोधी गुणधर्मामुळे  मुरुम पुटकुळ्यांपासून त्वचेचं संरक्षण होतं. 

Image: Google

दही आणि स्ट्राॅबेरी क्लीन्जर

दही आणि स्ट्राॅबेरी क्लीन्जर करण्यासाठी 2 पिकलेल्या स्ट्राॅबेरी आणि 2 चमचे दही घ्यावं. ब्लेण्डर किंवा मिक्सरच्या सहाय्यानं दोन्ही एकत्र वाटून घ्यावे. या मिश्रणानं चेहऱ्यास हलक्या हातानं मसाज करावा. 5-7 मिनिटं ते चेहऱ्यावर ठेवावं. थंडं पाण्यानं चेहरा स्वच्च धुवावा. दही आणि स्ट्राॅबेरीच्या क्लीन्जरमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचा खोलवर स्वच्छ होते. तेलकट त्वचेसाठी हे क्लीन्जर अतिशय उपयुक्त आहे.

 Image : Google

मध आणि कोरफड क्लीन्जर

कोरफडमधील थंडं आणि ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मामुळे उन्हामुळे काळवंडलेल्या, पोळलेल्या त्वचेसाठी मध आणि कोरफडीचं क्लीन्जर फायदेशीर ठरतं. मधातजिवाणूविरोधी आणि प्रोबायोटिक गुणधर्म असतात. मध संवेदनशील त्वचेसाठी उत्तम असतं. चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यस मधाचा उपयोग होतो. मध आणि कोरफडचं क्लीन्जर करण्यासाठी एक चमचा मध घेऊन त्यात एक चमचा कोरफड गर घालावा. दोन्ही गोष्टी एकत्र करुन त्याने चेहरा स्वच्छ करावा. हे क्लीन्जर रोज वापरावं.

Image: Google

दालचिनी-जायफळ क्लीन्जर

दालचिनी जायफळ क्लीन्जर तयार करण्यासाठी मध, दालचिनी पावडर आणि जायफळ पूड घ्यावी. तिन्ही गोष्टी नीट एकजीव करुन हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. दालचिनी, जायफळ आणि मध यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. त्वचेत ओलसरपणा निर्माण होतो. या क्लीन्जरमुळे त्वचेवरील घातक जिवाणू दूर होतात. त्वचेचा दाह आणि सूज या समस्या दूर होतात. त्वचा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दालचिनी जायफळचं क्लीन्जर रोज वापरायला हवं. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी