आपल्या शरीराच्या इतर भागांकडे आपण लक्ष देतो. पण काही भाग मात्र अगदीच दुर्लक्षित राहतात. त्यापैकी मुख्य भाग म्हणजे गुडघे, हाताचे कोपरे, पायाचे घोटे.. मानेला, गळ्याला आपण आंघोळीच्यावेळी साबण लावून ते स्वच्छ करतो. पण त्यांच्यासाठी तेवढी स्वच्छता पुरेशी नसते (home remedies to clean dark neck and tanning). त्यामुळे मग मान आणि गळा देखील काळवंडून जातात. हे सगळे काळे पडलेले भाग अतिशय विचित्र दिसतात आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो. म्हणूनच या भागांची स्वच्छता कशी करायची, याविषयी ही खास माहिती... (Natural Cleanser to get rid of Dark neck, dark knee and elbow)
काळवंडलेली मान, गुडघे, घोटे स्वच्छ करण्याचा उपाय
काळवंडलेली मान, गुडघे, घोटे, हाताचे कोपरे कसे स्वच्छ करायचे, त्यांच्यावरचा काळेपणा कसा काढून टाकायचा याविषयीचा एक सोपा उपाय jyotiagarwal7488 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त ३ पदार्थ वापरायचे आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे लिंबू, दुसरा पदार्थ आहे गुलाबजल आणि तिसरा पदार्थ आहे ग्लिसरीन.
त्यासाठी सगळ्यात आधी लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घ्या. लिंबाचा रस जेवढा निघेल तेवढेच त्यात ग्लिसरीन आणि गुलाब जल टाका. त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित हलवून घ्या.
आता हे तयार झालेलं लिक्विड तुम्ही काचेच्या एअर टाईट डबीमध्ये २ ते ३ महिने साठवून ठेवू शकता.
अक्षय्य तृतीया: आम्रखंड करणं किचकट वाटतं? बघा सगळ्यात सोपी रेसिपी, १० मिनिटांत आम्रखंड तयार..
हे आपण तयार केलेलं मिश्रण तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं एका वाटीत काढून घ्या. त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि थोडा पिळून घ्या. तुम्हाला मान, गळा, हाताचे कोपरे, गुडघे, पायाचे घोटे असा जो काळवंडलेला स्वच्छ करायचा असेल तिथे हे मिश्रण लावा आणि १ ते २ मिनिटे कापसाचा बोळा फिरवूनच मसाज करा.
यानंतर १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय नक्की करा. काही आठवडे नियमितपणे केल्यास टॅनिंग निघून जाईल आणि तुमची अगदी काळी पडलेली मान, कोपरे, घोटे, गुडघे एकदम स्वच्छ होऊन जातील.