केसांची समस्या सोडवण्यासाठी महिलावर्ग पूर्वीपासून खोबरेल तेलाचा वापर करीत आली आहे. खोबरेल तेलाचा वापर फक्त केसांसाठी नाही तर, त्वचा, जेवण व आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे. केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर होतो. खोबरेल तेलामुळे केस मऊ व शाईन करू लागतात. यामुळे केसांच्या निगडीत अनेक समस्या कमी होतात.
खोबरेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि सूक्ष्म पोषक घटक आढळतात. त्यामुळे याचा वापर आठवड्यातून दोन वेळा तरी करावा. बहुतांश वेळी शाम्पूने केस धुतल्यानंतर ते ड्राय - फ्रिझी होतात. अशा स्थितीत आपण कंडीशनरचा वापर करतो. कंडीशनरमुळे आपले केस मुलायम व शाईन करतात. पण काही कंडीशनरमध्ये केमिकल रसायने आढळतात, जे केसांचे पोत बिघडवते. आपण घरच्या घरी कमी साहित्यात खोबरेल तेलाचा वापर करून कंडीशनर बनवू शकता. ते कसे पाहा(Natural Coconut Conditioners For Lustrous, Shiny Hair).
खोबरेल तेलाचे कंडीशनर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
शिया बटर
जोजोबा एसेंशियल तेल
लॅव्हेंडर एसेंशियल तेल
केसांना लावा झेंडूच्या फुलांचा मास्क, चिप्पू चिप्पू केस होतील सुंदर - पाहा कसे लावायचे..
खोबरेल तेल
या पद्धतीने बनवा खोबरेल तेलाचे घरगुती कंडीशनर
सर्वप्रथम, डबल बॉयलर या पद्धतीने शिया बटर मेल्ट करून घ्या. आता मेल्ट झालेल्या शिया बटरमध्ये जोजोबा एसेंशियल तेल, लॅव्हेंडर एसेंशियल तेल मिसळून मिश्रण चांगले एकत्र करा. आता हे तयार मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. थोड्या वेळानंतर मिश्रणाला मिक्सर अथवा ब्लेंडरने पेस्ट तयार करून घ्या. अशा प्रकारे कोकोनट कंडीशनर वापरण्यासाठी रेडी.
केसांना वारंवार मेहेंदी लावता? सतत मेहेंदी लावण्याचे ५ साईड इफेक्ट्स, सावधान..
कोकोनट कंडीशनरला स्टोर करण्यासाठी टिप्स
कोकोनट कंडिशनर स्टोर करण्यासाठी आपण एअर टाइट कंटेनरचा वापर करू शकता. कंडिशनर हवाबंद डब्यात ठेवल्याने ते जास्त काळ टिकते. शाम्पूने केस धुतल्यानंतर याचा वापर करा.
कोकोनट कंडीशनर वापरण्याचे फायदे
कोकोनट कंडिशनर खराब झालेले केस दुरुस्त करण्याचे काम करते. यासह टाळूचे रक्त परिसंचरण देखील सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते. कोकोनट कंडीशनर केसांना हायड्रेटेड ठेवून, हिटिंग टूल्सपासून सरंक्षण करते. ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. याच्या नियमित वापरामुळे कोंडा आणि स्प्लिट एंड्सपासूनही सुटका मिळू शकते.