Lokmat Sakhi >Beauty > घामट चेहरा धुवायला विकतचे महागडे फेसवॉश कशाला? घरच्या घरीच करा परफेक्ट नैसर्गिक फेसवॉश

घामट चेहरा धुवायला विकतचे महागडे फेसवॉश कशाला? घरच्या घरीच करा परफेक्ट नैसर्गिक फेसवॉश

Natural Face Wash For Clean and Clear Skin : नैसर्गिक पद्धतीने फेस वॉश तयार केला आणि तो चेहरा धुण्यासाठी वापरला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 04:19 PM2023-05-08T16:19:08+5:302023-05-08T16:20:06+5:30

Natural Face Wash For Clean and Clear Skin : नैसर्गिक पद्धतीने फेस वॉश तयार केला आणि तो चेहरा धुण्यासाठी वापरला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Natural Face Wash For Clean and Clear Skin : Why buy expensive facewash to wash sweaty face? Make a perfect natural face wash at home | घामट चेहरा धुवायला विकतचे महागडे फेसवॉश कशाला? घरच्या घरीच करा परफेक्ट नैसर्गिक फेसवॉश

घामट चेहरा धुवायला विकतचे महागडे फेसवॉश कशाला? घरच्या घरीच करा परफेक्ट नैसर्गिक फेसवॉश

सकाळी झोपेतून उठल्यावर आंघोळीच्या वेळी, घरी आल्यावर आणि रात्री झोपताना इतक्या किमान वेळांना आपण तोंड धुतो. उन्हाळ्याच्या दिवसांत घाम घाम होत असल्याने यामध्ये काही प्रमाणात वाढ होते. बाहेरील प्रदूषण, धूळ आणि घाम यांमुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण चेहरा पाण्याने किंवा फेसवॉशने स्वच्छ धुतो. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपल्याला सूट होणारा असा फेसवॉश आपण निवडतो. कोरड्या त्वचेसाठी, ऑयली त्वचेसाठी बाजारात विविध कंपन्यांचे, विविध प्रकारचे फेसवॉश मिळतात (Natural Face Wash For Clean and Clear Skin). 

(Image : Google)
(Image : Google)

सुरुवातीला ट्रायल घेतल्यानंतर आपल्याला साधारणपणे कोणत्या प्रकारचा फेस वॉश सूट होतो ते आपण पाहतो आणि तशी निवड करतो. पण या फेसवॉशमध्ये केमिकल्स असतात ज्यामुळे त्वचेवर काही परीणाम होण्याची शक्यता असते. तसेच या फेसवॉशची किंमतही खूप जास्त असल्याने खिशाला भुर्दंड पडतो. त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने फेस वॉश तयार केला आणि तो चेहरा धुण्यासाठी वापरला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पाहूयात यासाठी कोणते घटक आवश्यक असतात आणि हा फेसवॉश कसा तयार करायचा. 

कसा करायचा फेसवॉश?

१. एका बाऊलमध्ये ग्रीन टीची बॅग घ्यायची. त्यामध्ये गरम पाणी घालून ही बॅग तशीच ठेवायची. 

२. या पाण्यात अर्क उतरल्यानंतर ती काढून टाकायची आणि यामध्ये थोडा मध घालायचा.

३. मग १ चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा कॉफी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

४. हा पॅक चेहऱ्यावर लावायचा आणि बोटांनी चेहऱ्याला थोडे चोळायचे. काही मिनीटे चेहऱ्यावर ठेवून चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवायचा. 

५. हा फेस वॉश आपण दररोज एकदा वापरु शकतो. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येण्यास मदत होते. 

फायदे 

१. चेहरा उजळण्यास मदत 

२. पिंपल्स जाण्यासाठी उत्तम उपाय 

३. त्वचा एक्सफॉलिएट होण्यासाठी फायदेशीर 

४. चेहऱ्यावरचे डाग जाऊन चेहरा स्वच्छ होण्यासाठी उपयुक्त

५. घटकांमध्ये अँटी बॅक्टेरीयल प्रॉपर्टी असल्याने त्वचेसाठी चांगले


 

Web Title: Natural Face Wash For Clean and Clear Skin : Why buy expensive facewash to wash sweaty face? Make a perfect natural face wash at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.