Join us  

केस धुताना भयंकर गळतात? केस धुतल्या धुतल्या लावा 'हे' घरगुती सिरम; घनदाट-लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 9:09 AM

Natural Hair Dyes to Try at Home : पार्लरमध्ये तासनतास न घालवता तुम्ही एका तासाच्या आत सुंदर, दांट लांबसडक केस मिळवू शकता. 

 (Image Credit- Hair Growth oil 63,Insta)

सण-उत्सवांच्यावेळी आपले केस, सुंदर-दाट दिसावेत असं प्रत्येकाला वाटते. केस सतत गळतात,  केसांना फाटे फुटतात किंवा केसांमध्ये गुंता होतो म्हणून लोक कापतात. असं न करता तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून केस सुंदर, मेंटेन ठेवू शकता. (Hair Care Tips) पार्लरमध्ये तासनतास न घालवता तुम्ही एका तासाच्या आत सुंदर, दांट लांबसडक केस मिळवू शकता. (Natural Ways To Get Permanent Hair Straightening At Home) घरच्याघरी सिरम आणि हेअर पॅक कसा बनवायचा ते पाहूया. घरगुती केसांची उत्पादनं बनवण्यासाठी तुम्हाला किचनमध्ये साहित्य उपलब्ध होईल. (How to Get Soft Shiny Hair diy Hair Straightening Diy Hair Growth)

घरच्याघरी होममेड सिरम कसे बनवावे?

१) सिरम बनवण्यासाठी सगळ्यात एक बाऊल घ्या त्यात २ चमचे ग्लिसरिन घाला. त्यानंतर त्यात १ चमचा एलोवेरा जेल घाला हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करा.  त्यानंतर कॅस्टर ऑईल घाला. या तेलामुळे  नवीन केस उगवतात. जर तुमच्याकडे कॅस्टर ऑईल नसेल तर तुम्ही व्हिटामीन ई कॅप्सुलसुद्धा घालू शकता. 

यात २ चमचे गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. या मिश्रणाने केसांची मसाज करा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल. हे सिरम एका बॉटलमध्ये भरून ठेवून द्या. आठवड्यातून  २ ते ३ वेळा उपाय करा.  केस धुतल्यानंतर तुम्ही हे सिरम केसांना लावू शकता.

केसांसाठी हेअर मास्क तयार कसा करावा? (How to Make Homemade Hair Mask)

1) हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला २ गोष्टींची आवश्यकता असेल.  सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये ग्लिसरिन घ्या त्यात एलोवेरा जेल घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एलोवेरात फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे केसांना शाईन आणि मजबूती मिळेल. केस वाढण्यासाठी हा हेअर मास्क फायदेशीर ठरतो.

चेहऱ्यावर तेज नाही-स्किन टॅन झाली? १० रूपयांत करा 'हा' उपाय, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग

2) केस धुण्याच्या कमीत कमी एक तास आधी केसांना हे मिश्रण लावा.  नंतर केस केस धुवा आणि कंडिशनरचा वापर करू नका. केस धुण्याआधी जर तुमच्या केसांमध्ये गुंता झाले असतील तर कंगव्याने केस विंचरून घ्या.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी