Join us  

Natural Hair Straightening Tips : नॅचरली केस स्ट्रेटनिंग करायचे 3 उपाय, पार्लरची गरजच नाही-घरच्याघरी करा हेअर स्ट्रेटनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 12:15 PM

Natural Hair Straightening Tips : केमिकल्सच्या जास्तीच्या वापराने केसांचा पोत पूर्णपणे खराब होतो, त्यापेक्षा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगले.

ठळक मुद्देकेस स्ट्रेट असावेत असं वाटत असेल तर केमिकल ट्रीटमेंटपेक्षा नैसर्गिक पर्याय केव्हाही चांगला घरच्या घरी काही गोष्टी केल्यास वाचू शकतील हजारो रुपये आणि दिसालही सुंदर

ज्यांचे केस कुरळे असतात त्यांना सरळ केस आवडतात आणि ज्यांचे सरळ असतात त्यांना आपले केस कुरळे का नाहीत असे वाटते. पण नैसर्गिकपणे आपल्याला ज्याप्रकारचे केस मिळाले आहेत ते जास्तीत जास्त चांगले कसे राहतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून केमिकल ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपले केस स्ट्रेट करुन घेण्याचे फॅड बरेच वाढले आहे. (Natural Hair Straightening Tips) यामध्ये स्ट्रेटनिंग, केरेटीन, रिबाऊंडनिंग आणि यांसारख्या बऱ्याच ट्रीटमेंटस केसांवर केल्या जातात. हजारो रुपये घेऊन आपण या ट्रीटमेंट घेतो खऱ्या, काही दिवसांतच आपले केस पुन्हा पहिल्यासारखे व्हायला लागतात. इतकेच नाही तर केमिकल्सच्या जास्तीच्या वापराने केसांचा पोत पूर्णपणे खराब होतो. 

(Image : Google)

आपण अनेकदा एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल की केस सेट कऱण्यासाठी हेअर स्ट्रेटनरचा वापर करतो. पण अशाप्रकारे सतत स्ट्रेटनर वापरला तर केसांची नैसर्गिक चमक कमी होत जाते. त्यामुळे महागडे पार्लरचे उपाय वापरण्यापेक्षा किंवा केसांचा पोत खराब होईल असे काही करण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन घरच्या घरी हेअर स्ट्रेटनिंग करता आले तर चांगले नाही का? पाहूयात असेच काही सोपे उपाय, ज्यामुळे सौंदर्यात तर भर पडेलच पण केसांचा पोतही खराब होणार नाही. 

१. एरंडेल आणि नारळाचे तेल

एरंडेल तेल किंवा पाने नारळाच्या तेलात भिजवून ठेवा. हे दोन्ही कोमट करुन केसांच्या मूळांना आणि केसांना लावा. हे लावताना चांगले मानिश करा. यानंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि ३० मिनीटे डोक्याला बांधून ठेवा. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. मात्र केस धुताना गरम पाण्याऐवजी गार पाण्याचा वापर करा. 

२. नारळाचे पाणी आणि लिंबाचा रस 

रात्री झोपताना नारळ पाणी आणि लिंबाचा रस एका भांड्यात एकत्र करुन ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण चांगले एकजीव झालेले असेल. हे मिश्रण केसांच्या मूळांपासून टोकापर्यंत सगळीकडे लावा. ३० ते ४० मिनीटे हा पॅक केसांवर तसाच ठेवून नंतर केस गार पाण्याने आणि हलक्या शाम्पूने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास केस स्टेट व्हायला मदत होईल.

(Image : Google)

३. कोरफड मास्क

ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलात कोरफडीचा गर घाला. हे मिश्रण काही वेळ चांगले एकजीव झाल्यानंतर केसांना एकसारखे लावा. साधारण ४० मिनीटे केसांवर हा पॅक तसाच ठेवून गार पाण्याने केस धुवा. त्यानंतर सल्फेट नसलेल्या शाम्पूने केस धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या स्ट्रेट होण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी