Join us  

केस गळून झाडूसारखे झालेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ तेल, दाट केसांसाठी टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 4:17 PM

Natural Hair Tonic for Thick Strong Hair : केस गळतात, पण पुन्हा वाढ होत नसेल तर, वेळीच ३ तेलाने केसांची निगा राखा..

केस गळतीची (Hair fall) समस्या सध्या सामान्य बनली आहे. बहुतांश जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहे. काहींचे केस गळतात, पण पुन्हा केस नवे उगवत नाही. ज्यामुळे टक्कल पडण्याची समस्या निर्माण होते. केस गळतीमागे अनेक कारणे असू शकतात. पण केस गळती रोखण्यासाठी बरेच कमी उपाय आपल्याला मदत करतात.

काही जण केमिकल रसायनयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात (Hair Oil). तर काही जण नैसर्गिक उत्पादनांचा वापर करतात. केस गळू नये म्हणून आपण विविध हेअर ऑईलचा वापर करतो (Hair care Tips). पण केस गळती सुरु असताना कोणते तेल वापरावे? केसांना लांब, दाट आणि कोंडामुक्त करण्यासाठी कोणते तेल उपयुक्त ठरेल? पाहा(Natural Hair Tonic for Thick Strong Hair).

हेअर ग्रोथ बुस्ट करणारे तेल

रोझमेरी तेल

रोझमेरी एक औषधी वनस्पती आहे. यामुळे केसांची योग्यरित्या वाढ होते. यासह यात जीवनसत्त्वे ए, सी आणि बी६ असते. यासह दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मज्जातंतूंच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि रक्त परिसंचरण सुधारते. जर केसांची योग्य वाढ व्हावी असे वाटत असेल तर, आपण केसांना रोझमेरी तेल लावू शकता. यामुळे केसांची तर वाढ होईलच शिवाय इतरही समस्या सुटतील.

कच्च्या बटाट्यात दडलंय उजळ त्वचेचं सिक्रेट, बटाट्याच्या रसात मिसळा एक गोल्डन गोष्ट; चेहरा उजळेल..

आर्गन तेल

अनेक गुणांनी समृद्ध आर्गन तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, स्क्लेलीन, ऑलेइक अॅसिड, लिनोलिक अॅसिड, पॉलीफेनॉल आढळते. जे केसांना मॉइश्चरायझ करते. नियमित आर्गन ऑइल वापरल्याने केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. जर आपल्याला कोंडामुक्त केस हवे असतील तर, केसांना आर्गन ऑईल लावा.

आंघोळ केल्यानंतर चुकूनही करू नका ४ चुका, स्किन खराब होण्याचे महत्वाचे कारण; आणि...

कांद्याचे तेल

केसांच्या वाढीसाठी कांद्याचे तेल फायदेशीर ठरते. अँटी-ऑक्सिडंट्सने परिपूर्ण हे तेल, स्कॅल्पचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून मुक्त करण्यासाठी प्रभावी ठरते. कांद्याचे तेल टाळूला अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म प्रदान करते. ज्यामुळे स्काल्पवर इन्फेक्शन होत नाही. कांद्याचे तेल आपण घरातही तयार करू शकता. यासाठी एका वाटीत केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. त्यात कांद्याच्या फोडी घाला. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. गाळणीने गाळून तेल एका डब्यात काढून घ्या, व या तेलाचा वापर आठवड्यातून ३ वेळा करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स