Lokmat Sakhi >Beauty > केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

Hair Care Tips: अशक्तपणा आल्यावर आपल्याला जशी टॉनिकची (natural hair tonic) गरज असते, तशीच गरज कमजोर झालेल्या आपल्या केसांनाही असतेच.. म्हणूनच तर हा बघा त्यावरचा उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 01:15 PM2022-11-18T13:15:05+5:302022-11-18T13:16:10+5:30

Hair Care Tips: अशक्तपणा आल्यावर आपल्याला जशी टॉनिकची (natural hair tonic) गरज असते, तशीच गरज कमजोर झालेल्या आपल्या केसांनाही असतेच.. म्हणूनच तर हा बघा त्यावरचा उत्तम उपाय

Natural hair tonic with just 2 ingredients, Best home remedies for dandruff, hair fall and gray hair | केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

Highlightsकेसगळती, केस पांढरे होणं, कोंडा.... या सगळ्या त्रासांवर हा बघा एक उत्तम उपाय

बऱ्याचदा रोजच्या आहारातून काही जणांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे मग अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर काही टॉनिक घ्यायला सांगतात. त्यातून मग भरपूर उर्जा मिळते. लहान मुलांना तर बऱ्याचदा टॉनिक द्यावेच लागते. असाच उपाय कधी कधी आपल्या केसांबाबत करणंही गरजेचं असतं. कारण आपल्या आहारातून किंवा आपण केसांची जी काही काळजी घेतो, त्यातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही आणि केसांची वाढ खुंटते. शिवाय केसगळती, केस पांढरे होणं, कोंडा (Best home remedies for dandruff, hair fall and gray hair) असे त्रासही सुरू हाेतात. या सगळ्या त्रासांवर हा बघा एक उत्तम उपाय (Natural hair tonic). 

 

इन्स्टाग्रामच्या meghnasfoodmagic या पेजवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लवंग आणि गुलाब यांच्यापासून केसांसाठी पोषक ठरणारं टॉनिक कसं तयार करायचं,

त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

याविषयी माहिती देण्यात आली आहे. हे टॉनिक आठवड्यातून दोन वेळा शाम्पू केल्यानंतर केसांना लावावं. त्यामुळे डोक्यातला कोंडा कमी होतो, केसगळती कमी होते, डोक्याच्या त्वचेला पोषण मिळाल्यामुळे केसांची वाढ चांगली होऊ लागते. तसंच या टॉनिकमधून केसांना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के मिळतं, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

कसं करायचं केसांसाठी टॉनिक?
१. यासाठी आपल्याला २ कप पाणी, १ टेबलस्पून म्हणजेच १५ ते २० लवंग, आणि ४ ते ५ मध्यम आकाराच्या गुलाबांच्या पाकळ्या असं साहित्या लागणार आहे.

प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास होतो? १ सोपा उपाय, मोशन सिकनेस लगेचच होईल कमी 

२. पाणी एक भांड्यात ओता, त्यात लवंग टाका आणि ते गॅसवर उकळायला ठेवा.

३. उकळून जेव्हा पाणी दिड कप होईल तेव्हा त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. या प्रयोगासाठी गावरान गुलाबाचा वापर करावा.

४. जेव्हा गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग बदलेल तेवहा गॅस बंद करा.

५. थंड झाल्यावर हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा. पुढील २ महिने तुम्ही ते वापरू शकता.  

 

Web Title: Natural hair tonic with just 2 ingredients, Best home remedies for dandruff, hair fall and gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.