कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या आजकाल अनेक जणांना भेडसावते आहे. अगदी विशी- पंचविशीतल्या तरुणाईचेही निम्म्यापेक्षाही अधिक केस पांढरे झाले आहेत. कमी वयात पांढऱ्या झालेल्या केसांमुळे अनेकजणांचा आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे केस रंगवावे तर वाटतात, पण त्यासाठी केसांवर केमिकलयुक्त कलर, डाय वापरण्याची भीती वाटते. कारण त्यामुळे केस आणखीनच पांढरे होतात, असा अनेकांचा अनुभव ऐकलेला असतो (Natural Home made dye for gray hair). शिवाय थंडीच्या दिवसांत केसांवर हर्बल मेहंदी लावायलाही नको वाटते. कारण सर्दी होण्याची भीती असते. (How to colour hair naturally?)
तुमच्या समोरही अशीच अडचण असेल तर पांढरे झालेले केस रंगविण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय करून बघू शकता. या उपायामुळे केस काही मुळापासून काळे होणार नाहीत.
थंडीमुळे अंग कोरडं पडून खूपच खाज येतेय? ३ उपाय करा, त्वचा होईल मऊ- मुलायम
पण केसांचा पांढरा रंग काही दिवस का होईना पण लपविण्यासाठी या उपायाचा निश्चितच फायदा होऊ शकतो. शिवाय हा उपाय केल्याने केसांचे काहीही नुकसान होणार नाही, हे निश्चित. कारण आपण यात सगळे नैसर्गिक पदार्थच वापरणार आहोत.
केसांसाठी नॅचरल डायसाहित्य२ टेबलस्पून कलूंजी,
व्हिटॅमिन ई च्या २ गोळ्या
चिमुकलीला करायची होती आईची नक्कल, म्हणून मग तिच्या बाबांनी..... बघा व्हायरल व्हिडिओ
२ टीस्पून बेबी शाम्पू
३ टेबलस्पून बीटरूटचा रस
३ टेबलस्पून हर्बल मेहेंदी
अर्धा कप पाणी
कसा करायचा हर्बल डाय१. हर्बल डाय करण्यासाठी सगळ्यात आधी कलूंजीच्या बिया मंद गॅसवर एक- दोन मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची पावडर करा.
सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो, ड्रायनेस जाणवतो? १ सोपा उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम
२. यानंतर बीटरूटच्या रसामध्ये मेहंदी २ तास आधीच भिजवून ठेवा. त्यात आवश्यकतेनुसार बीटरूटचा आणखी रस घालू शकता.
३. आता मेहंदी, कलूंजी पावडर, व्हिटॅमिन ई गोळ्या तसेच बेबी शाम्पू हे सगळे साहित्य एकत्र करा आणि पाणी टाकून व्यवस्थित कालवून घ्या.
४. हे मिश्रण आता पांढऱ्या झालेल्या केसांवर लावा. एक ते दिड तास तसेच केसांवर राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाका.