Lokmat Sakhi >Beauty > मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक

मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक

Natural Home Remedies For Dark Neck : ब्यूटी पार्लरचा खर्च कशाला? घरगुती उपायांनीही टॅनिंग दूर होऊ शकते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 01:02 PM2024-05-05T13:02:03+5:302024-05-05T13:02:51+5:30

Natural Home Remedies For Dark Neck : ब्यूटी पार्लरचा खर्च कशाला? घरगुती उपायांनीही टॅनिंग दूर होऊ शकते..

Natural Home Remedies For Dark Neck | मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक

मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक

उन्हाळा सुरु झाला की, स्किन टॅनिंगची समस्या कॉमन होते (Tanning Removal Cream). पण स्किन काळवंडल्यावर आपल्याला तितकंच लाजिरवाणे वाटते. पण वेळीच यावर लक्ष द्यायला हवे (Skin care tips). अन्यथा शरीर निस्तेज दिसू लागते. चेहरा टॅन झाल्यावर आपण ते घालवण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतो (Beauty Tips).

पण चेहऱ्याऐवजी आपण आपल्या मान, हात आणि पायांकडे देखील लक्ष द्यायला हवे. जर आपल्याला ब्यूटी पार्लरमध्ये न जाता, टॅनिंग घालवायचं असेल तर, कोमट पाण्यात काही घरगुती गोष्टी मिसळा, आणि क्रीम तयार करा. या नैसर्गिक क्रीममुळे टॅनिंग तर दूर होईलच, शिवाय डेड स्किन, मुरुमांचे डागही गायब होतील. यासह हात, पाय आणि मानही उजळेल(Natural Home Remedies For Dark Neck).

टॅनिंग घालवण्याचा घरगुती उपाय

लागणारं साहित्य

कोमट पाणी

लिंबाचा रस

खोबरेल तेल

शाम्पू

कॉफी

पायांवर उन्हामुळे चपलांच्या टॅनिंगचे डाग? हातही काळवंडले? २ घरगुती उपाय-पाय चमकतील

गव्हाचं पीठ

अशा पद्धतीने करा घरगुती टॅनिंग रिमुव्हल क्रीम

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा इनो घाला. नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा शाम्पू, एक चमचा कॉफी आणि २ चमचे गव्हाचं पीठ घालून मिक्स करा.

ना रस - ना पेस्ट; ५ रुपयांच्या काकडीने करा फेशिअल; चेहरा करेल ग्लो - टॅनिंग होईल गायब

मिक्स केल्यानंतर बोटावर मिश्रण घेऊन हात, पाय, चेहरा आणि मानेवर लावा. ५ मिनिटानंतर लिंबाच्या सालीने रगडून घ्या. ५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे एका वापरात आपल्याला रिझल्ट दिसेल. आपण या मिश्रणाचा वापर आठवड्यातून एकदा करू शकता.

चेहऱ्यावर गव्हाच्या पीठाचे फायदे

गव्हाच्या पिठामध्ये अधिक प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. तसेच यामध्ये विटामिन ई आणि जिंक असते. ज्यामुळे डेड स्किन, टॅनिंग, मुरुमांचे डाग गायब होतील. शिवाय सुरकुत्यांच्या समस्या दूर करून इलास्टिसिटी राखून ठेवण्यास मदत करेल.

Web Title: Natural Home Remedies For Dark Neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.