Join us  

साखर-कॉफी-कोरफड-हळद-लिंब, ५ जादूई गोष्टी-काळवंडलेली मान होईल एकदम स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 8:27 PM

Natural Home Remedies For Dark Neck : मानेवर काळसर थर दिसायला लागला की अनेकींना टेंशन येतं, त्यावरच हा उपाय...

आपण बरेचदा पाहिले असेल की काहीजणांचे संपूर्ण शरीर हे गोरे असते परंतु मान तितकीच काळी- कुट्ट असते. वातावरणातील प्रदूषण, धूळ, माती, सतत मानेवर येणारा घाम यामुळे आपल्या मानेवर एक काळा पॅच तयार होतो. हा मानेवरचा काळा पॅच शरीराच्या रंगाच्या तुलनेत अधिकच गडद असल्यामुळे तो पटकन दिसण्यात येतो. मान काळी पडण्याची अनेक कारणं असू शकतात. उन्हामुळे, खोटे दागिने घातल्याने यांसारख्या इतर कारणांमुळे मान काळी पडते. मग यावर खूप उपाय करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो. मात्र, मान काळी दिसत असल्याने आपल्याला चिंता वाटते.

जास्तीत जास्त लोक मानेच्या काळपटपणाने हैराण झालेले आपल्याला पहायला मिळतात. चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा मानेची त्वचा काळी का दिसते ? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. चेहऱ्याच्या सुंदरतेकडे लक्ष देत असताना अनेकांचे मानेकडे दुर्लक्ष होते. एकदा हे काळे डाग मानेवर चिकटून राहीले तर बरेच उपाय करूनही ते निघत नाहीत. वेगवेगळे पर्याय वापरून अनेकदा आपण मान घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु रोज अशाप्रकारे मान घासून ती स्वच्छ होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करून सहजरित्या मान स्वच्छ करु शकतो(Natural Home Remedies For Dark Neck).

मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी नेमके काय करावे ?

साहित्य :- 

१. कोरफड - १ छोटा तुकडा२. हळद - १ टेबलस्पून २. कॉफी - १ टेबलस्पून ३. साखर - १ टेबलस्पून ४. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस..

कृती :- 

१. सर्वप्रथम कोरफड घेऊन मधोमध कापून त्याचे २ तुकडे करून घ्यावेत. २. आता कोरफडीचा गर आपल्याला दिसेल त्यावर सुरीच्या मदतीने हलकेच कापून बारीक खाचा करून घ्याव्यात. ३. त्यानंतर या कोरफडच्या छोट्या तुकडयावर प्रत्येकी एक - एक चमचा हळद, कॉफी, साखर, लिंबाचा रस घालावा. 

चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

४. आता हा कोरफडीचा तुकडा मानेवर व पाठीवर जिथे गडद पॅच पडला आहे तिथे हलक्या हाताने घासून मसाज करावा. ५. १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने मान व पाठ स्वच्छ धुवून घ्यावी. ६. सोशल मीडियावर काळी मान चमकवण्याचा हा उपाय वेगाने व्हायरल होत आहे. यात सांगण्यात आलं आही की आठवड्यातून ३ वेळा जर तुम्ही हा उपाय केला तर चांगले परिणाम दिसून येतील. इतकचं नाही तर हा घरगुती उपाय लहान मुलांसाठी गुणकारी ठरेल.

पहिल्यांदाच बिकिनी वॅक्सिंग करताना ७ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अवघड जागेचं दुखणं विकत घ्याल...

हा पॅक काळपट मानेवर व पाठीवर लावण्याचे फायदे :- 

१. हा पॅक लावल्याने त्वचेला नवी चमक मिळते. यासोबतच त्वचा ग्लो आणि तुकतुकीत होते.

२. त्वचेला टोन करण्यासाठी हा पॅक उपयुक्त ठरेल.

३. हा पॅक लावल्याने त्वचेवरील पिगमेंटेशनचे डाग, डार्क स्पॉट आणि  मुरूम निघण्यास मदत मिळते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स