Lokmat Sakhi >Beauty > १ चिमूटभर हळद लावूनही होतील पांढरे केस काळे; कलर- मेंहेदी न लावता केसांसाठी सोपा उपाय

१ चिमूटभर हळद लावूनही होतील पांढरे केस काळे; कलर- मेंहेदी न लावता केसांसाठी सोपा उपाय

Natural Home Remedies For Grey Hair : पिकलेल्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी लोक ग्लोबल कलर करतात तर काहीजण तेल लावतात. पण या सगळ्याचा परिणाम तात्पुरता दिसून येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:59 PM2023-07-20T13:59:29+5:302023-07-20T14:59:16+5:30

Natural Home Remedies For Grey Hair : पिकलेल्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी लोक ग्लोबल कलर करतात तर काहीजण तेल लावतात. पण या सगळ्याचा परिणाम तात्पुरता दिसून येतो.

Natural Home Remedies For Grey Hair : Effective Home Remedies For Grey Hair | १ चिमूटभर हळद लावूनही होतील पांढरे केस काळे; कलर- मेंहेदी न लावता केसांसाठी सोपा उपाय

१ चिमूटभर हळद लावूनही होतील पांढरे केस काळे; कलर- मेंहेदी न लावता केसांसाठी सोपा उपाय

आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या जाणवणं खूपच कॉमन झालंय. तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्यात गडबड, चुकीची लाईफस्टाईल यांमुळे केस पांढरे होतात.  पिकलेले केस दिसायला सुरूवात झाली की आत्मविश्वास कमी होतो. केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरली की त्याचे साईड इफेक्ट्सही दिसून येतात.(Natural Home Remedies For Grey Hair) पिकलेल्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी लोक ग्लोबल कलर करतात तर काहीजण तेल लावतात. पण या सगळ्याचा परिणाम तात्पुरता दिसून येतो. केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Effective Home Remedies For Grey Hair)

केसांसाठीही गुणकारी ठरते हळद

हळदीच्या आयुर्वेदीक गुणांमुळे हळदीला खजिना मानले जाते.  हळदीमुळे केवळ भाज्यांना चवच येत नाही तर  रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.  हे केसांसाठी नॅचरल हेअर टॉनिकचेही काम करते. केसांच्या मुळांना काही दिवस हळद लावल्यानं तुम्ही काळे-दाट केस मिळवू शकता. 

केस गळतीमुळे कपाळ सपाट दिसतंय? फक्त २ दिवस हे तेल लावा; उगवतील नवे-दाट केस

केसांना नैसर्निकरित्या काळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी हळदीची जाड पेस्ट तयार करा. त्यासाठी एका वाटीत २ चमचे मध घाला. त्यानंतर सम प्रमाणात हळद आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि पेस्ट बनवा. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून १५ ते २० मिनिटांसाठी सुकवा. त्यानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवा. २ आठवडे हा उपाय केल्यानंतर केस दाट-काळे झालेले दिसून येतील.  

हळद आणि नारळाचं तेल

केसांना चमक येण्यासाठी तुम्ही हळद आणि नारळाचे तेल मिसळून लावू शकता.  त्यासाठी एका वाटीत नारळाचे तेल गरम करा. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात हळद मिसळा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावा आणि केसांची चंपी करा. जवळपास २५ ते ३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस सिल्की आणि शायनी दिसतील.

हळद आणि एलोवेरा

केसांना मुळापासून मजबूत बनवण्यासाठी  हळदीत एलोवेरा जेल मिसळा. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा हळद मिसळा. यात थोडं एलोवेरा जेल मिसळा. त्यानंतर पाण्याचं शेक बनवून बॉटलमध्ये भरा. त्यानंतर केसांच्या मुळांना  लावून ठेवा. दीड तासानं केस स्वच्छ  पाण्यानं धुवा. यामुळे केस मुळापासून मजबूत राहतात.

Web Title: Natural Home Remedies For Grey Hair : Effective Home Remedies For Grey Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.