Join us

पांढरे केस जास्त उगवायला लागले? खोबरेल तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा, मुळापासून केस होतील काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:31 IST

Natural Home Remedies For Grey Hair (kes kale karnyasathi upay) : नारळाचे तेल केसांवर कोणत्या पद्धतीनं लावायचे ते पाहूया. नारळाचे तेल केसांवर लावून तुम्ही पांढरे केस काळे बनवू शकता.

बरेच लोक नियमित स्वरूपात केसांना नारळाचे तेल लावतात. या तेलातील नैसर्गिक गुणधर्म केसांना  भरपूर पोषण देण्यासाठी गुणकारी ठरतात. नारळाच्या तेलात आवळा मिसळून लावल्यानं केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येईल. नारळाचे तेल त्वचेसह केसांवरही फायदेशीर ठरते. या तेलाने फेस मसाज केल्याने सुरकुत्या आणि फाईन  लाईन्स चेहऱ्यावर दिसत नाहीत. नारळाचे तेल केसांवर कोणत्या पद्धतीनं लावायचे ते पाहूया. नारळाचे तेल केसांवर लावून तुम्ही पांढरे केस काळे बनवू शकता. (How to get black hairs using coconut oil) 

१) जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे (white hair remedy) होत असतील तर नारळाच्या तेलात ताजा आवळा उकळून घ्या. आवळ्याचा रंग बदलेपर्यंत शिजवा. त्यानंतर तेल थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. त्यानंतर सकाळी हेअर वॉश करा. या उपायाने केस काळे होण्यास मदत होईल. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांचे आरोग्य चांगले राहील. स्काल्प इन्फेक्शनपासून बचाव होईल.

२) याशिवाय कोंड्याची समस्याही उद्भवणार नाही. नारळाच्या तेलात एंटी मायक्रोबिअल आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. याशिवाय  कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन सी यांसारखे पोषक तत्व असतात. जे केसांना आतून मजबूत बनवतात आणि केस बाहेरून चमकदार दिसतात.

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

३) केस काळे करण्यासाठी  नारळाचं तेल आणि मेहेंदी प्रभावी उपाय आहे. मेहेंदी रंग केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि केस काळेभोर दिसतात.  आवळा आणि मेहेंदी पावडर एकत्र करून त्यात ३ ते ४ चमचे नारळाचं तेल घालून उकळून घ्या.

या मेहेंदीची पानं घाला. तेलाचा रंग बदलेपर्यंत उकळा. त्यानंतर तेल  थंड करून केसांच्या मुलांना लावा.  कमीत कमी ४० मिनिटं तसेच ठेवा नंतर केस धुवा.  ही क्रिया नियमित केल्याने केस काळे होण्यास मदत होईल.

रोज गळून केस पातळ झाले? सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला दाट केसांसाठी खास उपाय

४) नारळाचं तेल आणि आवळा एकत्रितरित्या केसांना लावल्यास केस काळे होण्यास मदत होते. ३ चमचे नारळाच्या तेलात  २ चमचे आवळा पावडर  मिसळा. नंतर एका भांड्यात काढून गरम करा. हे तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावून मसाज करा रात्रभर तसेच ठेवा. सकाळी शॅम्पूने केस धुवा.  आवळ्यात कोलोजन वाढवण्याची क्षमता असते. कारण यात व्हिटामीन सी असते. हे केसांच्या विकासासाठी आवश्यक असते. यामुळे  केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी