Join us  

ऐन सणासुदीला पांढरे केस डोकावतात? चमचाभर चहाचा खास उपाय-डायशिवाय केस होतील काळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 8:37 AM

Natural Home Remedies For Grey Hair : पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया जेणेकरून तुम्हाला काळेभोर केस मिळवण्यास मदत होईल. (Natural Home Remedies For Grey Hair)

केस गळण्याची, केस पांढरे होण्याची समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उद्भवते केस गळणं वेळीच कमी झालं नाही तर केसांना टक्कलही पडू शकते. अकाली केस पिकल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. (Pandhare Kes kale kase karayche) पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया जेणेकरून तुम्हाला काळेभोर केस मिळवण्यास मदत होईल. (Natural Home Remedies For Grey Hair)

कांदा आणि चहा पावडरचा खास उपाय

सगळ्यात आधी एका लहानश्या प्लेटमध्ये कांदा चिरून घ्या. कांद्यात चहा पावडर आणि १ ग्लास पाणी घालून उकळवून घ्या.  उकळवलेल्या चहाच्या पाण्यात खोबरेल तेल घाला. (Home Remedies to turn white hair into black naturally) यात कापूस बुडवून केसांच्या मुळांना हे तेल लावा. यातील पोषक तत्व केसांच्या वाढीस चालना देतील याशिवाय केस गळण्याची समस्याही कमी होईल. केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही  सोप्या पद्धतीने हा उपाय करू शकता. (Home Remedies For Darken Grey Hair)

केस गळणं थांबवण्यासाठी चहा पावडर  फायदेशीर ठरते.  आजकाल चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यातील अनियमितेमुळे केस गळण्याची समस्या प्रत्येकालाच उद्भवते. हा त्रास टाळण्यासाठी लोक शॅम्पू किंवा तेल बदलतात  तर कधी महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. घरच्याघरी कोणताही सोपा उपाय करून तुम्ही केसांशी निगडीत समस्यांशी लढू शकता. ज्यामुळे काही मिनिटांतच तुम्हाला रिजल्ट दिसून येईल.

काजू-बदामापेक्षा जास्त प्रोटीन देतो हा पदार्थ; रोज खा-स्वस्तात मिळेल पोषण, कॅन्सरचा टळेल धोका

केसांना हेल्दी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही चहापावडरचं पाणीसुद्धा वापरू शकता. चहा पावडर अनेक घरांमध्ये चहा बनवण्यासाठी वापरली जाते.  यात एंटी सेप्टीक, एंटी इफ्लेमेटरी  आणि एंटी ऑक्सिनडेंट्स असतात. ज्यामुळे केस हेल्दी आणि चमकदार राहण्यास मदत होते. 

चहा पावडरचं हेअर वॉटर कसं तयार करायचं?

केसांसाठी चहा पावडरचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक भांडं घ्या. त्यात जवळपास २ कप पाणी घालून २ चमचे चहा पावडर उकळवून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर त्यात टि बॅग्स घालू शकता.  चहा पावडर केसांना लावण्यासाठी तयार असेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी