Lokmat Sakhi >Beauty > केस गळून खूप पातळ झाले? ५ नैसर्गिक उपाय, केस होतील दाट, लांबसडक...

केस गळून खूप पातळ झाले? ५ नैसर्गिक उपाय, केस होतील दाट, लांबसडक...

Natural Home Remedies for Hair Care : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीच काही खास टिप्स शेअर करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 03:05 PM2023-04-02T15:05:11+5:302023-04-02T15:06:06+5:30

Natural Home Remedies for Hair Care : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीच काही खास टिप्स शेअर करतात

Natural Home Remedies for Hair Care : Hair loss and thinning? 5 natural remedies, hair will be thick, long... | केस गळून खूप पातळ झाले? ५ नैसर्गिक उपाय, केस होतील दाट, लांबसडक...

केस गळून खूप पातळ झाले? ५ नैसर्गिक उपाय, केस होतील दाट, लांबसडक...

आपले केस लांबसडक आणि जाडजूड असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण काही कारणाने ते कधी फार गळतात तर कधी तुटतात. कधी केसांत खूप कोंडा होतो तर कधी ते अचानक खूप विरळ होतात. अशावेळी नेमकं काय करावं हे आपल्याला समजत नाही. अशावेळी एकतर आपण बाजारात मिळणारी वेगवेगळी उत्पादनं वापरतो. नाहीतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस घेतो. याचा तात्पुरता उपयोग होत असला तरी रासायनिक घटकांमुळे केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशावेळी काही नैसर्गिक उपाय केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठीच काही खास टिप्स शेअर करतात. हे उपाय केल्यास केसांचा आकार वाढण्यास मदत होत असल्याने केस छान दाट आणि लांबसडक होतात. हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे समजून घेऊया (Natural Home Remedies for Hair Care)..

१. कांदा 

कधी आरोग्याच्या तक्रारी, प्रदूषण, रासायनिक उत्पादनांचा वापर यांमुळे केस खूप पातळ होतात आणि गळतात. कांदा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो केसांसाठीही अतिशय उपयुक्त असतो. कांद्याचा रस काढून त्याने केसांच्या मुळांना मसाज केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. कांद्यामध्ये सल्फर असल्याने कोलायजनची वाढ होण्यास ते फायदेशीर असते. कोलायजनची पातळी चांगली असेल तर केस मजबूत राहण्यास आणि जाड होण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट आणि मध यांचा मास्कही आपण वापरु शकतो. 

२. मेथ्या 

मेथ्या डायबिटीससाठी किंवा आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात हे आपल्याला माहित आहे. मात्र केसांसाठीही मेथ्यांचा चांगला उपयोग होतो. मेथ्यामध्ये प्रोटीन, लोह, पोटॅशियम हे घटक असतात. हे घटक केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळे मेथ्यांचा मास्क तयार करुन आपण तो केसांना लावू शकतो. 

३. कोरफड 

कोरफडीमध्येही सौंदर्यासाठी फायदेशीर असे बरेच गुणधर्म असतात. कोरफडीचा गर काढून घेऊन त्याने केसांना मसाज केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. मसाज करुन ३० मिनीटे ठेवायचे आणि नंतर केस नेहमीप्रमाणे धुवायचे. 

४. आवळा 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोलेजनच्या निर्मितीसाठी आवळा फायदेशीर असतो. आवळ्याचा केसांसाठी वापर करायचा तर त्याचे हेअरमास्क करता येतो. यासाठी आवळ्याच्या पावडरमध्ये तेल किंवा पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावून केस धुण्याआधी १ तास तशीच ठेवायची आणि त्यानंतर केस धुवायचे. 

५. मेहेंदी 

मेहेंदी हा आयुर्वेदातील एक औषधी पदार्थ असून केसांसाठी मेहंदीचा अतिशय चांगला उपयोग होतो. केसांना चमक येण्यासाठी आणि ते सिल्की होण्यासाठी मेहंदी उपयुक्त ठरते. यासाठी मेहेंदी पावडर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट बनवावी आणि ती केसांना लावावी.  

 

 

Web Title: Natural Home Remedies for Hair Care : Hair loss and thinning? 5 natural remedies, hair will be thick, long...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.