ओपन पोर्समुळे (Open Pores) चेहरा डल दिसून येतो. या पोर्समधून तेल बाहेर येते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. या उपायांचा समावेश केल्यास महिन्याभरात त्वचेवर फरक दिसून येईल. (Solution for Open Pore's Problem) त्वचा डागविरहीत आणि क्लिअर दिसेल. त्याआधी ओपन पोर्स त्वचेवर का येतात हे समजून घ्यायला हवं. (Natural Home Remedies for Open Pores)
ओपन पोर्स म्हणजे नक्की काय?
आपल्या त्वचेवर लहान लहान रोमछिद्र असतात हे पोर्स त्वचेतील नॅच्युरल ऑईल आणि घाम बाहेर काढतात. या रोगछिद्रांद्वारे त्वचा श्वास घेते. या छिद्रांबरोबरच तेलग्रंथीसुद्धा असतात. ज्या सिबम उत्पादन करतात. हे पोर्स जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना ओपन पोर्स म्हटलं जातं. यामळे त्वचा डल आणि कोरडी दिसते. यामुळे ओव्हरऑल चेहऱ्याची सुंदरताही कमी होते.
ओपन पोर्स का येतात?
१) चेहऱ्यावर ओपन पोर्स होण्याचं कारण अनुवांशिक असू शकते. रोमछिद्र मोठी किंवा लहान असू शकतात. रोमछिद्रांची समस्या जर आई वडिलांना असेल तर तुम्हालाही उद्भवू शकते.
२) ज्या लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना ओपन पोर्सची समस्या जास्त होते. ऑयली स्किनमुळे चेहऱ्यावर सिबमचे उत्पादन अधिक होते. ऑयली स्किन रोमछिद्रांचा आकार वाढवतात.
३) चेहरा स्वच्छ ठेवण्याासाठी २ वेळा चेहरा धुणं ठिक आहे पण तुम्ही त्यापेक्षा जास्तवेळा चेहरा धुत असाल तर हे ओपन पोर्सचे कारण ठरू शकते. सतत चेहरा धुतल्यानं रोमछिद्र मोठी होतात.
ओपन पोर्स घालवण्याचे उपाय
- जर चेहऱ्यावर बरेच ओपन पोर्स असतील तर रोज न चुकता सनस्क्रीन (sun screen) वापरा. असं केल्याने चेहऱ्यावर चमक दिसून येईल आणि चेहरा एक्ने फ्री दिसेल.
- सगळ्यात आधी गुलाब पाण्यात एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. एक तास चेहऱ्याला लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा.
- २ चमचे गव्हाच्या पीठात एलोवेरा जेल मिसळून फेसवर लावा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण सहज दूर होईल. हा पॅक चेहऱ्यावरून काढून टाकण्यासाठी कोमट पाणी वापरा.
- रात्री झोपताना मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुवून मगच झोपा. यामुळे त्वचेची चमक टिकून राहण्यास मदत होईल.