Join us  

दुधात ५ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, नकोसे केस गायब - चेहऱ्यावर येईल नवे तेज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2024 2:13 PM

Natural Home Remedy to Remove Facial Hair : फेशियल हेअर रिमूव्हल मास्क तयार करणं आहे सोपं, १० मिनिटात थ्रेडींगच्या वेदनांशिवाय येईल ग्लो

अनेक महिला चेहऱ्यावरील केसांमुळे (Facial Hair) त्रस्त आहेत. कितीही काढले तरी चेहऱ्यावर पुन्हा केस येतातच. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते, पण चेहऱ्यावरील केस सौंदर्यामध्ये बाधा बनतात. चेहऱ्यावरील केस काढणे म्हणजे अवघड काम. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी बऱ्याच महिला रेझर किंवा फेशियल वॅक्सिंग करतात. तर, काही महिला लेझर ट्रिटमेण्ट देखील करून घेतात.

पण या सगळ्या महागड्या ट्रिटमेण्ट घेण्याऐवजी आपण साखर, खोबरेल तेल आणि काही घरगुती साहित्यांचा वापर करून फेशियल हेअर रिमूव्हल मास्क तयार करू शकता (Skin Care). या मास्कमुळे चेहऱ्यावरील केस तर निघतीलच शिवाय स्किनवर नैसर्गिक तेज येईल(Natural Home Remedy to Remove Facial Hair).

अशा पद्धतीने तयार करा फेशियल हेअर रिमूव्हल मास्क

लागणारं साहित्य

साखर

दूध

खोबरेल तेल

केमिकल डाय कशाला? २ बदाम-कांद्याची साल; ५ मिनिटात तयार करा नॅचरल हेअर डाय

हळद

बेसन

कॉफी

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा साखर, २ चमचे दूध, अर्धा चमचा खोबरेल तेल, अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. बाऊल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात एक चमचा बेसन आणि कॉफी पावडर घालून मिक्स करा. अशा प्रकारे फेशियल हेअर रिमूव्हल मास्क तयार.

कोंड्याने जीव नको केला, केस बारीक कापणार? कोरफडीच्या गराचा करा १ उपाय, कोंडामुक्त केस

फेशियल हेअर रिमूव्हल मास्क लावण्याची योग्य पद्धत

सर्वात आधी चेहरा नीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर चमच्याने पेस्ट घेऊन चेहऱ्यावर लावा. पेस्टचा जाड थर चेहऱ्यावर लावा, जेणेकरून चेहऱ्यावरील केस सहज निघतील. १० ते १५ मिनिटानंतर विरुद्ध दिशेने पेस्ट हाताने काढा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस तर निघतीलच, शिवाय डेड स्किन आणि मुरुमांच्या डागांपासूनही सुटका मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी