Lokmat Sakhi >Beauty > केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस

Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder : केसांसाठी मेहेंदी उत्तमच; कंडिशनिंग व कलरिंग अशी दोन्ही काम करते, परंतु मेंहेंदीचे पोषणमूल्य वाढावे यासाठी त्यात बदामाचे तेल मिसळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 09:00 AM2023-08-13T09:00:15+5:302023-08-14T15:26:04+5:30

Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder : केसांसाठी मेहेंदी उत्तमच; कंडिशनिंग व कलरिंग अशी दोन्ही काम करते, परंतु मेंहेंदीचे पोषणमूल्य वाढावे यासाठी त्यात बदामाचे तेल मिसळा...

Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder. | केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस

फक्त वय झाल्यावरच केस पांढरे होतात असं नाही. वेगवेगळ्या कारणांनी अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पांढरे केस सौंदर्यात अडथळा निर्माण करतात. यावर उपाय म्हणून केस डाय करणे, कलर करणे , केसांना मेहंदी लावणे असे उपाय केले जातात. डाय आणि कलर यापेक्षा केसाना मेहंदी लावणं हा सुरक्षित पर्याय आहे. मेहंदी लावल्याने केस सुरक्षित राहातात, पांढर्‍या केसांची समस्या दूर होते आणि केस सुंदर दिसतात. मेहंदी ही केसांसाठी कंडिशनिंग आणि कलरिंग असं दोन्ही काम करते.

केसांना मेहेंदी लावल्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. केसांना मेहेंदी लावल्याने पांढरे केस लपवले जाणे, केस मुलायम होणे, केसांना शाईन येणे, केसांचा बिघडलेला पोत सुधारणे असे असंख्य बदल आपल्या केसांमध्ये दिसून येतात. आपल्यापैकी बरेचजण केसांना मेहेंदी लावतात तेच मुळात पांढरे झालेले केस कलरिंग करण्याच्या हेतूने. मेहेंदी केसांना लावल्यावर केसांना छान गडद रंग यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण मेहेंदीमध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक, कृत्रिम गोष्टी मिसळतो. जर आपल्या केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल आणि त्यांना रेशमी - चमकदार आणि मजबूत बनवायचे असेल, तर मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळून मेहेंदीची पेस्ट तयार करावी. मेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळण्याची पद्धत आणि ते केसांना लावण्याचे काही फायदे जाणून घेऊया(Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder).

मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल नेमकं कोणत्या पद्धतीने मिसळावे... 

केसांना मेहंदी लावण्यासाठी प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या. नंतर त्यात मेहंदीची पावडर घालून नीट मिक्स करून घट्ट द्रावण तयार करा. नंतर मेहंदीमध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा आणि थोडा वेळ तसेच राहू द्यावे. आता केसांना मेहंदी लावा आणि तासभर ती केसांवर तशीच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. 

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, केसांच्या समस्या चुकीचा कंगवा वापरल्याने वाढतात कारण...

मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळण्याचे फायदे :- 

१. कोंड्यापासून सुटका :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळल्याने कोंडा लवकर निघून जाण्यास मदत होते. वास्तविक, टाळूच्या कोरडेपणामुळे केसांत कोंडा तयार होतो. त्यामुळे अनेक वेळा केसांना खाज येण्याची आणि केस गळण्याची समस्या समोर येते. अशा स्थितीत मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळल्यास टाळूची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते, त्यामुळे कोंडा नाहीसा होऊ लागतो.

२. स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यासाठी :- बदामाचे तेल टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते. वास्तविक बदामाच्या तेलामध्ये असलेली जीवनसत्त्वे केसांसाठी उत्कृष्ट क्लिनिंग एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळून लावल्याने टाळूवर घाण जमा होऊ देत नाही. यामुळे स्कॅल्प स्वच्छ राहते आणि केस मजबूत व बळकट होतात.

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

३. केसांची वाढ होते :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळून लावल्यानेही केसांची वाढ चांगली होते. हे केस गळणे थांबवते आणि केसांच्या वाढीस गती देते. इतकेच नाही तर केसांच्या मुळांना बळकट आणि मजबूत बनवण्यातही हे खूप फायदेशीर ठरते. 

४. केस निरोगी राहतील :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळल्याने केस निरोगी होतात. मेंहेंदीमध्ये तेल मिसळून लावल्याने मेंदीचे पोषण दुप्पट होते. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन A, B आणि E चे गुणधर्म टाळूचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे केस निरोगी होतात तसेच त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडते. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

५. केस होतात रेशमी - चमकदार :- केसांना मेंहेंदी लावल्याने केसांची चमक आपोआप वाढते. पण मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळल्याने केसांची चमक अनेक पटींनी वाढते, जी दीर्घकाळ टिकून राहते.

Web Title: Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.