आपल्या सौंदर्यात 'केस' हा सर्वात महत्वाचा भाग असतोच. प्रत्येकीला आपले केस लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत असे वाटत असते. सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलचा (How to do Keratin Hair Treatment at Home) थोडाफार परिणाम आपले केस, त्वचा यांवर होतोच. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी किंवा केस सुंदर दिसावेत यासाठी आजकाल सर्रास अनेकजणी महागड्या ट्रिटमेंट (Natural Keratin Treatment At Home For Straight , Smooth And Shiny Hair with Natural Ingredients) करतात. या महागड्या ट्रिटमेंट्स करण्यासाठी आपण लागेचच हायफाय सॅलोन किंवा पार्लर गाठतो. आपले केस सुंदर दिसावेत यासाठी हजारो रुपये तर खर्च होतातच पण केसांवर विविध प्रकारची केमिकल्स वापरल्याने केसांचा पोतही खराब होतो. सध्या केस स्ट्रेट, चमकदार आणि सिल्की दिसावेत यासाठी केसांवर केरेटीन ट्रिटमेंट करुन घेण्याचा मोठा ट्रेंड सुरु आहे(Best homemade keratin hair treatments).
स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग, केरेटीन यांसारख्या ट्रीटमेंटस करुन घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. केमिकल्सचा वापर करुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरुन ही ट्रीटमेंट करता येऊ शकते. इन्स्टाग्रामवर अनु ब्यूटी टिप्स या पेजवर अगदी कमीत कमी पदार्थ वापरुन केसांवर केरेटीन ट्रिटमेंट कशी करायची याबाबत माहिती दिली आहे. ज्यामुळे केस छान सिल्की आणि शायनीही होण्यास मदत होईल, पाहूया ही ट्रिटमेंट कशी करायची...
साहित्य :-
१. शिजवून घेतलेला तांदूळ - १/२ कप (भात तयार करतो तसाच भात शिजवायचा)
२. खोबरेल तेल - ४ टेबलस्पून
३. दही - ४ टेबलस्पून
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
काही केल्या केसांची वाढच होत नाही? वापरा चमचाभर 'ही' आयुर्वेदिक पावडर, केस होतील लांबसडक-दाट...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये शिजवून घेतलेला तांदूळ म्हणजेच भात घ्यावा.
२. आता या भातात दही आणि खोबरेल तेल घालून चमच्याने हलवून मिक्स करून घ्यावे.
४. एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात हे बाऊलमधील एकजीव केलेलं मिश्रण घालून मिक्सरमध्ये एकजीव पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावे.
५. मिक्समध्ये वाटून घेतलेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. आपला केरेटीन हेअर मास्क केसांवर लावण्यासाठी तयार आहे.
थंडीत स्किन कोरडी - डल दिसतेय ? स्किन प्रोबेल्म्स होतील दूर, वापरा विंटर स्पेशल 'हा ' फेसपॅक...
या हेअरमास्कचा वापर कसा करायचा ?
केरेटीन हेअर मास्क वापरताना केसांना विंचरून त्यातील गुंता संपूर्णपणे काढून घ्यावा. त्यानंतर केसांचा भांग पाडून केसांचे दोन्ही भागात विभाजन करावे. आता ब्रश किंवा हातांच्या मदतीने स्काल्पवर आणि केसांवर संपूर्णपणे लावून घ्यावा. असा हा हेअर मास्क केसांवर किमान ३० मिनिटे तरी आहे तसाच लावून ठेवावा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. आपले केस पूर्वीपेक्षा अधिक चमकदार, स्ट्रेट आणि सुंदर दिसतील.