Lokmat Sakhi >Beauty > महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

Beauty Tips For Winter And Diwali: हिवाळा सुरू झाला की त्वचेतला कोरडेपणा जाणवू लागतो. असं होऊ नये म्हणून यंदाच्या हिवाळ्यासाठी या बघा २ स्पेशल ब्यूटी टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 01:51 PM2022-10-18T13:51:58+5:302022-10-18T13:55:43+5:30

Beauty Tips For Winter And Diwali: हिवाळा सुरू झाला की त्वचेतला कोरडेपणा जाणवू लागतो. असं होऊ नये म्हणून यंदाच्या हिवाळ्यासाठी या बघा २ स्पेशल ब्यूटी टिप्स.

Natural nourishment to your skin for upcoming winter, Use of coconut for soft, shiny skin | महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

Highlightsऐन दिवाळीच्या दिवसांत त्वचा काेरडी पडून तिची चमक अशी हरवू द्यायची नसेल, तर आजपासून दररोज काही  दिवस हा उपाय करा.

दिवाळीचे दिवस जवळ येताच हवेत छानसा गारवा जाणवू लागतो. गुलाबी थंडी सुरू होते. ही थंडी हवीहवीशी वाटत असली तरी त्वचेसाठी मात्र ती तेवढीच त्रासदायक ठरते. त्यामुळेच तर दिवाळीच्या दिवसांतच काही जणांची त्वचा कोरडी  (home remedies for dry skin in winter) दिसायला  सुरुवात होते. ऐन दिवाळीच्या दिवसांत त्वचा काेरडी पडून तिची चमक अशी हरवू द्यायची नसेल, तर आजपासून दररोज काही  दिवस हा उपाय करा. दिवाळीपर्यंत त्वचेचं छान पोषण होईल आणि चेहरा चमकदार, कोमल (Use of coconut for soft, glowing skin) दिसेल. हा उपाय आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी फेसबूकवर शेअर केला आहे.

 

या उपायामध्ये मंजिरी यांनी त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने पोषण कसे करायचे, याविषयी माहिती दिली आहे. हिवाळ्यात आपण त्वचा काेरडी पडू नये म्हणून वेगवेगळे क्रिम लावतो.

ॲल्यूमिनियम किंवा लोखंडाच्या कढईला कसं बनवायचं नॉनस्टिक, बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास ट्रिक

पण यासोबतच काही नैसर्गिक उपाय करून पाहिले, तर ते आपल्या त्वचेसाठी निश्चितच अधिक पोषक ठरते. म्हणून या दिवसांत आहारात खोबरं, नारळ यांचा वापर नक्की करावा, तसेच घरच्याघरी त्वचेसाठी खोबऱ्याचा फेसपॅक कसा बनवायचा, याची माहितीही मंजिरी यांनी शेअर केली आहे. 

 

त्वचेसाठी खोबऱ्याचा फेसपॅक
१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुकं खोबरं आणि देवघरातील सहान यांचा वापर करायचा आहे.

२. त्यासाठी खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घ्या.

साखर आवडते तर बिंधास्त खा! पण किती आणि कशी खायची, वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला..

३. सहानीवर थोडंसं दूध टाका.

४. त्यावर खोबऱ्याचा तुकडा उगाळून त्याचा लेप काढून घ्या. 

५. हा लेप दररोज चेहऱ्याला लावा आणि ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

६. हा उपाय केल्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही, तसेच खोबऱ्याच्या स्निग्धतेमुळे त्वचेचे खूप चांगल्या पद्धतीने पाेषण होईल. 

 

नारळाचाही करा उपयोग
- हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये, यासाठी मंजिरी यांनी नारळाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.

हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?

- आठवड्यातून २ वेळा नारळ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्या पोटात गेलं पाहिजे, अस त्यांनी सांगितलं. 

असे अधिक उपाय जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

https://www.facebook.com/reel/506355984692700

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)

 

Web Title: Natural nourishment to your skin for upcoming winter, Use of coconut for soft, shiny skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.