केस गळणं ही कॉमन समस्या आहे जी आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये उद्भवते. केस गळणं कमी करण्यासाठी महागडी उत्पादनं वापरूनही हवातसा बदल झालेला दिसत नाही. (Home remedies to stop hair fall and regrowth) किचनमध्ये उपलब्ध असलेले काही पदार्थ वापरून तुम्ही ही समस्या टाळू शकता. पार्लरमध्ये जाऊन केसांवर खर्च केल्यानं केसांवर हवातसा बदल दिसून येतोच असं नाही. केस चांगले ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहू शकता. (Natural Remedies to Stop Hair Fall)
१) कांद्याच्या रसामध्ये सल्फर कंपाऊंड आढळतो, ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. ताज्या कांद्याचा रस आपल्या टाळूवर चांगला लावा आणि 30 मिनिटे असेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.
२) मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिनासोबतच निकोटिनिक अॅसिडही आढळते. ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी बिया बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांवर चांगली लावा आणि 30 मिनिटे राहू द्या. मग केस धुवा.
केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर
३) ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात. तुम्ही ग्रीन टी चा काढा बनवू शकता. टाळू आणि केसांवर लावू शकता.
४) प्रोबायोटिक्स समृद्ध दही केसांच्या वाढीस मदत करू शकते. दह्यात मध मिसळून केस आणि टाळूला लावा आणि ३० मिनिटांनी केस धुवा.
५) बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि लोह असते, जे केसांसाठी फायदेशीर आहे. बीटरूटच्या रसात एक चमचा मध मिसळा आणि केस आणि टाळूला चांगले लावा. त्यानंतर ३० मिनिटांनी केस धुवा.
चेहरा अजिबात काळा पडणार नाही; अंघोळीनंतर १ काम करा, दिवसभर फ्रेश, ग्लोईंग दिसेल त्वचा
६) आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळते. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि केस आणि टाळूला लावा. नंतर काही वेळाने केस धुवा.
७) कढीपत्त्यात प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते केस गळणे थांबवण्याचे आणि वाढीस प्रोत्साहन देण्याचे काम करतात. खोबरेल तेलात मूठभर कढीपत्ता उकळवा आणि नंतर त्याचे मिश्रण तयार करा. या मिश्रणाने डोक्याला चांगले मसाज करा. काही वेळ केस तसेच ठेवल्यानंतर केस धुवा.