Lokmat Sakhi >Beauty > केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

Natural Remedy To Color White Hair Black : डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:43 PM2024-11-04T15:43:43+5:302024-11-04T16:00:48+5:30

Natural Remedy To Color White Hair Black : डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो.

Natural Remedy To Color White Hair Black Using iron Kadhai Home Remedies For Grey Hairs | केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

केस खूपच पांढरे झालेत? लोखंडाच्या कढईत करा 'हा' खास उपाय, मुळापासून काळे होतील केस

जर तुम्ही  केसांना काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय किंवा डाय वापरत असाल आणि तरीही वेळेआधीच तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही केसांना काळा रंग देण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करू  शकता. केसांना काळे बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे   उपाय करू शकता. (Home Remedies For Grey Hairs) ज्यामुळे केसांना नवीन रंग मिळेल आणि केस दाट दिसतील. (Natural Remedy To Color White Hair Black Using iron Kadhai )

केस काळे करण्यासााठी काही घरगुती उपाय केल्यास तुमचं काम सोपं होऊ शकतं. लोखंडाच्या कढईत हा उपाय तुम्हाला करावा लागेल. ज्यामुळे केस स्ट्राँग होतील. हा उपाय करण्याची सोपी पद्धत कशी ते समजून घेऊ. (Natural Remedy To Color White Hair Black)

केस पांढरे होण्याची कारणं

केस पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात  ज्यात मिलेनिनची कमतरता हे मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त ताण घेता तेव्हा शरीरात पोषणाची कमतरता भासते आणि पोषणाच्या कमतरतेनं केस गळू लागतात.  केस काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.  

असा तयार करा व्हाईट हेअर डाय

सगळ्यात आधी एक लोखंडाची कढई घ्या. त्यात चहा पावडर घाला. गॅस मध्यम  आचेवर ठेवून त्यात मोहोरीचं तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि कलौंजी पावडर घालून हे सर्व पदार्थ  कमीत कमी  ८ ते १० मिनिटं शिजवून घ्या.

कॅल्शियमच्या कमतरतेनं हाडंच नाही मेंदूसुद्धा होतोय पोकळ; लक्षणं ओळखा, शरीर निरोगी राहील

पूर्ण झाल्यानंतर एका वाटीत  गाळून तेल काढून घ्या. तयार आहे केस काळे करण्याचा असरदार उपाय. रात्री झोपण्याआधी  केसांना हे तेल लावून ठेवा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. या उपायानं केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल.

केसांसाठी आवळ्याचे फायदे

डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. ज्या लोकांचे केस पांढरे होत आहेत, केसांची वाढ  थांबली आहे, केस तुटून पटत आहे किंवा स्काल्पवर खात येत असेल तर आवळा केसांसाठी उत्तम ठरेल. यामुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्स आणि जिंक असते. ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. 

Web Title: Natural Remedy To Color White Hair Black Using iron Kadhai Home Remedies For Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.