Lokmat Sakhi >Beauty > कंगवा फिरवताच केस घरभर पसरतात? जास्वंदाचा 'हा' पॅक लावा-गळणं थांबेल, दाट होतील केस

कंगवा फिरवताच केस घरभर पसरतात? जास्वंदाचा 'हा' पॅक लावा-गळणं थांबेल, दाट होतील केस

Natural Ways for Great Hair : केसांच्या वाढीसाठी केमिकल्सयुक्त क्रिम्स आणि शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनलेले कंडिशनर्स आणि शॅम्पू वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:42 PM2023-09-05T12:42:27+5:302023-09-05T13:06:43+5:30

Natural Ways for Great Hair : केसांच्या वाढीसाठी केमिकल्सयुक्त क्रिम्स आणि शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनलेले कंडिशनर्स आणि शॅम्पू वापरू शकता.

Natural Ways for Great Hair : Home made hair pack for hair growth hibiscus for hair growth | कंगवा फिरवताच केस घरभर पसरतात? जास्वंदाचा 'हा' पॅक लावा-गळणं थांबेल, दाट होतील केस

कंगवा फिरवताच केस घरभर पसरतात? जास्वंदाचा 'हा' पॅक लावा-गळणं थांबेल, दाट होतील केस

केसांच्या समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना उद्भवतात. (Hair Care Tips) केस गळणं कमी करण्यासाठी बाजारात अनेक शॅम्पू, तेलं उपलब्ध आहेत पण ज्याचा फारसा उपयोग होत नाही. (Natural Ways for Great Hair) केसांच्या वाढीसाठी केमिकल्सयुक्त क्रिम्स आणि शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनलेले कंडिशनर्स आणि शॅम्पू वापरू शकता. (How to stop hair fall)

केसांसाठी घरगुती हेअर पॅक कसा बनवायचा? (How to make hair pack)

एका मिक्सरच्या भांड्यात पाण्यात भिजवलेली जास्वंदांची फूल घाला. त्यात जास्वंदाची पानं, कडुलिंबाची पानं, कढीपत्ता एलोवेरा जेल घाला. याची मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा आणि अर्धा तास ते ४५ मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. (Homemade Hair Masks Will Give You Longer)

केस दाट आणि मजबूत होण्यासाठी तुम्हील आठवड्यातून १ ते २ वेळा हा हेअर पॅक अप्लाय करू शकता.  या हेअर पॅकमुळे हेअर मॉईश्चराईज राहता.  डॅमेज झालेले केस रिपेअर होतात. ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते. त्याप्रमाणेच केसांनाही असते.  असे पॅक केसांवर वापरल्याने केसांमध्ये पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. 

मान खूप काळी पडली? फक्त ३ मिनिटांत करा बनाना फेशियल; १० रुपये खर्च- मान दिसेल स्वच्छ

- जास्वंदामुळे केसांचा विकास होतो याशिवाय केस मुळापासून मजबूत होतात.  याशिवाय  केस मजबूत आणि निरोगी दिसतात. व्हिटमीन सी समृद्ध जास्वंदाचे तेलसुद्धा हेअर फॉलिकल्सना आणि केसांच्या मूळांना मजबूत ठेवते. जास्वंदाची पानं केसांना मजबूत आणि पौष्टीक, हायड्रेट ठेवतात.  ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या टळते.

- जर तुम्हाला केस डल किंवा डॅमेज झालेले वाटत असतील तर तुमच्यासाठी कढीपत्ता हा उत्तम पर्याय आहे.  कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये दही मिसळा आणि अर्धा तास केसांना लावून ठेवा. या उपायाने केसांमध्ये वेगळीच चमक दिसून येईल. एका आठवड्यात १ ते २ वेळा हा उपाय केल्यास फरक दिसेल.

केस वाढतच नाही-रोज गळतात? स्पा- केरेटीनपेक्षाही ४ असरदार आणि स्वस्त उपाय, दाट-सुंदर होतील केस

- केसांना एलोवेरा जेल लावल्याने कोरड्या स्काल्पपासून आराम मिळतो. शॅम्पू लावण्याच्या तासभर आधी तुम्ही हे जेल केसांना लावू शकता.  त्यानंतर केस धुवा. केस सॉफ्ट झालेल दिसतील.

Web Title: Natural Ways for Great Hair : Home made hair pack for hair growth hibiscus for hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.