Join us  

केस पातळ झालेत? चमचाभर कॉफीचा खास शाम्पू लावा; केस गळती कमी, केस होतील सिल्की-दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:10 PM

Natural Ways For Hair Growth : स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या  वस्तूंचा वापर केसांसाठी उत्तम मानला जातो.

केस सतत गळत असतील तर  हळूहळू केसांवर टक्कल पडू लागतं. केस कमी झाल्यामुळे तुम्ही वेळेआधीच म्हातारे झाल्यासारखे दिसू शकतात. (Natural Ways For Hair Growth) चेहरा वयस्कर दिसतो. गळलेले केस पुन्हा मिळवणं शक्य नसते. केसांवर नवीन केसांची ग्रोथ चांगली व्हावी तसेच  केस कधीच गळू नये यासाठी केमिकल्स असलेल्या शॅम्पूचा कमीत कमी प्रमाणात वापर करायला हवा. (Homemade Shampoo For Hair Growth)

ज्यामुळे केस गळती उद्भवत नाही आणि केस दाट-सुंदर होतात. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या  वस्तूंचा वापर केसांसाठी उत्तम मानला जातो. कारण याचे साईड इफेक्ट्स नसतात आणि कमीत  कमी वेळात चांगला परिणाम केसांवर दिसून येतो. (Tips For Healthy Strong Hairs)

मेडीकल न्युज टु डेच्या रिपोर्टनुसार बाळाला जन्म देणे, ताप येणं, प्रोटीन इन्टेक कमी असणं, सर्जरी, क्रोनिक आजार यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात. अक्रोड, भोपळ्याच्या बियांचे तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरते.  यामुळे व्यक्तीच्या ओव्हरऑल आरोग्यावरही परिणाम होतो. पण  याचा इफेक्ट मानसिक आरोग्यावरही दिसून येतो. 

पोट सुटलंय-मांड्या मोठ्या दिसतात? १० रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय; झरझर वजन कमी होईल

रिसर्चनुसार लोहाच्या कमतरतेमुळे पुरूष आणि स्त्रियांचे केस गळतात. (Ref)अंगात रक्त कमी झालं किंवा खाण्यापिण्यात पोषक घटकांचा अभाव असेल तर केस गळतात. संशोधनानुसार लोहाच्या कमतरतेमुळे केस गळणं आणि केसांशी संबंधित  समस्या उद्भवतात.  डॉक्टर सांगतात की प्लेटलेट्समध्ये वाढ झाल्यास केसांच्या वाढीस उत्तेजना मिळू शकते.

केसांच्या समस्या टाळण्यासाठी सोपे उपाय कोणते?

केसांच्या समस्या टाळण्यासाठी सगळ्यात आधी ताजी एलोवेराची पानं व्यवस्थित धुवून घ्या.  त्यानंतर  एलोवेरा जेल एका ताटात काढून घ्या.  एलोवेरा जेल आणि कॉफी, ग्लिसरिन, व्हिटामीन ई कॅप्सूल, एरंडेल तेल, २ टिस्पून शॅम्पू आणि पाणी घालून मिक्सरमधून फिरवून पेस्ट तयार करून घ्या.

१० दिवस ही पेस्ट एका डब्यात ठेवा. त्यानंतर केसांना लावा. केसांच्या मुळांपासून लांबीपर्यंत सर्वच ठिकाणी हा शॅम्पू लावा. १० ते १५ मिनिटांनी केस स्वच्छ  पाण्याने धुवून घ्या. या उपायामुळे केसांवर एक वेगळी चमक येईल आणि  केस गळती समस्याही उद्भवणार नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी