Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

Natural Ways To Prevent Sweaty Scalp In Summers उन्हाळ्यात केसांना घाम सतत येतो, गरम होतं यामुळे वैतागला असाल तर ४ उपाय करुन पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 01:59 PM2023-04-13T13:59:18+5:302023-04-13T14:00:04+5:30

Natural Ways To Prevent Sweaty Scalp In Summers उन्हाळ्यात केसांना घाम सतत येतो, गरम होतं यामुळे वैतागला असाल तर ४ उपाय करुन पाहा

Natural Ways To Prevent Sweaty Scalp In Summers | उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

उन्हाळ्यात संपूर्ण शरीराची लाही लाही होते. उन्हाच्या तडाख्यामुळे संपूर्ण शरीरावर घामाच्या धारा सुटतात. उन्हाळ्यात केसांमध्ये अधिक घाम साचतो. केसांमध्ये बराच वेळ घाम राहिल्याने केस खराब होतात. केस अधिक चिपचिपत व दुर्गंधी येऊ लागते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारची उत्पादने वापरत असतात.

पण हे उत्पादने आपल्या केसांना हानी देखील पोहचवू शकतात. अशात जर आपण घाम येण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, या काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे केसांच्या चिपचिपत समस्येपासून सुटका मिळेल. व घामामुळे केसांना हानी देखील पोहोचणार नाही. केस कायम सिल्की व शाईन करतील(Natural Ways To Prevent Sweaty Scalp In Summers).

केसांमधून घाम येण्याची सुटका कशी करावी

योग्य वेळी शॅम्पू करा

उन्हाळा येताच योग्य वेळी केसांना शॅम्पू करण्यास सुरुवात करा. त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने केस कोरडे करा. केसांमध्ये शॅम्पू केल्याने केसांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. व घाम येण्याची समस्याही दूर होते. त्यामुळे जर आपण केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर योग्य वेळी केसांना शॅम्पू करा.

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

ॲपल व्हिनेगरचा वापर करा

ॲपल व्हिनेगर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येपासूनही सुटका करते. याचा वापर करण्यासाठी एक चमचा ॲपल साइडर व्हिनेगर घ्या,  त्यात गरम पाणी मिसळून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने टाळूवर मसाज करा, नंतर २० मिनिटांनी केस धुवून घ्या.

लिंबू लावा

लिंबू शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांमधील घाम व दुर्गंधीपासून सुटका हवी असेल, तर लिंबाचा वापर करा. याचा वापर करण्यासाठी, शॅम्पू करण्यापूर्वी २० मिनिटे टाळूवर लिंबाचा रस लावा, काही वेळानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन

हायड्रेटेड रहा

दिवसभरात 2 ते 3 लीटर पाणी प्यायल्याने, शरीर निरोगी राहण्यासोबतच घामाची समस्याही दूर होते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर थंड राहते. पाणी पिऊनही अनेक आजार सहज बरे होऊ शकतात.

केसांची मालिश करा

केसांना मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे केसांमध्ये घाम येणे कमी होते. आठवड्यातून 1-2 वेळा कोमट तेलाने आपल्या टाळूची मालिश करा. असे केल्याने केस मजबूत होतात आणि वेगाने वाढतात.

Web Title: Natural Ways To Prevent Sweaty Scalp In Summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.