Lokmat Sakhi >Beauty > नवरात्र विशेष : भोंडला- गरब्याच्या मेकअपसाठी परफेक्ट ५ स्टेप फॉर्म्युला, सगळे तारीफ करुन दमतील

नवरात्र विशेष : भोंडला- गरब्याच्या मेकअपसाठी परफेक्ट ५ स्टेप फॉर्म्युला, सगळे तारीफ करुन दमतील

Navratri Special 5 step easy makeup tips : सणावारांच्या वेळी मात्र छान तयार होण्यासाठी मेकअपच्या काही किमान गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 02:16 PM2024-10-04T14:16:30+5:302024-10-04T18:41:05+5:30

Navratri Special 5 step easy makeup tips : सणावारांच्या वेळी मात्र छान तयार होण्यासाठी मेकअपच्या काही किमान गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

Navratri Special 5 step easy makeup tips: Perfect 5 Step Makeup Formula for garba and bhondla , Look Beautiful | नवरात्र विशेष : भोंडला- गरब्याच्या मेकअपसाठी परफेक्ट ५ स्टेप फॉर्म्युला, सगळे तारीफ करुन दमतील

नवरात्र विशेष : भोंडला- गरब्याच्या मेकअपसाठी परफेक्ट ५ स्टेप फॉर्म्युला, सगळे तारीफ करुन दमतील

नवरात्र म्हणजे गणपतीनंतर येणारा एक महत्त्वाचा सण. या काळात घरोघरी घट बसतात, त्यामुळे हळदीकुंकवाला, सवाष्ण म्हणून किंवा भोंडला नाहीतर गरबा-दांडीया खेळायला आपण जातोच जातो. अशा विविध कारणांनी बाहेर पडत असताना आपण छान दिसायला हवं असं प्रत्येकीला वाटतं. कामाचा थकवा, आरोग्याच्या तक्रारी यामुळे चेहरा तितका फ्रेश आणि ताजातवाना दिसतोच असे नाही. मग मेकअपनी आपल्याला चेहऱ्यावरचे फोड किंवा काळपटपणा झाकता येणे शक्य असते. मात्र त्यासाठी मेकअप करण्याची परफेक्ट पद्धत, स्टेप्स माहित असतील तर आपलं काम झटपट होतं. एरवी आपण काजळ आणि फारतर लिपस्टीक लावून घराबाहेर पडतो. पण सणावारांच्या वेळी मात्र छान तयार होण्यासाठी मेकअपच्या काही किमान गोष्टी समजून घ्यायला हव्यात. पाहूया मेकअपच्या काही सोप्या स्टेप्स (Navratri Special 5 step easy makeup tips)...

१. क्लिंजिंग

सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे चेहरा क्लिंजरने स्वच्छ करुन घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरचा घाम, धुळीचे कण किंवा आणखी काही असेल तर ते निघून जाण्यास मदत होते. तुमच्याकडे क्लिंजर नसेल तर कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ धुतला तरी चालतो.

(Image : Google)
(Image : Google)

२. मॉईश्चरायजिंग

ही स्टेप अतिशय महत्त्वाची असून चेहरा थोडा ओलसर असतानाच त्यावर मॉईश्चरायजर एकसारखे लावून घ्यावे. यामुळे मेकअप केल्यानंतरही चेहरा कोरडा आणि रुक्ष दिसत नाही. मेकअप सेट होण्यासाठी आणि नीट बसण्यासाठीही मॉईश्चरायजर अतिशय गरजेचे असते. 

३. प्रायमर

बाजारात आपल्या त्वचेच्या रंगाला सूट होतील असे स्कीन रंगातच वेगवेगळ्या शेडस असलेले प्रायमर मिळतात. चांगल्या कंपनीचा एखादा प्रायमर तुम्ही आणलात तर त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग झाकण्यास मदत होते. विशेषत: डोळ्याच्या खालचे डाग झाकण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. 

४. कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट

हाही मेकअपमधील एक महत्त्वाचा घटक असतो. कन्सिलरमुळे चेहरा एकसारखा दिसण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्याचा टोन एकदम छान दिसतो. मात्र कन्सिलर लावल्यानंतर तो सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट किंवा साधी पावडर तरी लावायलाच हवी. त्यामुळे चेहऱ्याला छान मेकअप लूक येतो.

(Image : Google)
(Image : Google)

५. काजळ आणि लिपस्टीक

या नेहमीच्याच गोष्टी असल्या तरी मेकअप केल्यावर तो उठून येण्यासाठी काजळ छान एकसारखे लावायला हवे. ते बाहेर किंवा खाली पसरले तर चांगले दिसत नाही. तसेच लिपस्टीक लावतानाही आधी लिप लायनरने शेप काढून मग लावायला हवी. त्यानंतर लिप ग्लॉस लावल्यास ओठ खुलून येण्यास मदत होते.  

Web Title: Navratri Special 5 step easy makeup tips: Perfect 5 Step Makeup Formula for garba and bhondla , Look Beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.