Join us

नवरात्र स्पेशल व्यायाम: रोज करा फक्त ५ मिनिटे फेस योगा, चेहरा दिसेल कायम तरुण- सतेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 17:02 IST

Benefits of Facial Yoga: शरीर बेढब होऊ नये म्हणून शरीराला जशी व्यायामाची गरज असते, तशीच चेहऱ्याचे तारुण्य (face yoga for reducing wrinkles) टिकविण्यासाठी चेहऱ्यालाही व्यायामाची गरज असतेच..

ठळक मुद्दे फेसयोगाचे काही प्रकार नियमित केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या येणं तर कमी होतंच, पण चेहरा खूप तेजस्वी, चमकदारही होतो. 

डाॅ. अंबिका याडकीकर, फिजिओथेरपीस्ट सौंदर्य टिकविण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी तुम्ही कितीही कॉस्मेटिक्सचा उपयोग केला तरी त्याचा तुमच्या त्वचेवर होणारा परिणाम मर्यादितच असतो. सौंदर्य खरोखरच वाढवायचे असेल तर नैसर्गिक पद्धतीने (natural remedies for glowing skin) काही उपाय करणे गरजेचे आहे. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे योग्य आहार आणि दुसरा उपाय म्हणजे व्यायाम. शरीराप्रमाणेच चेहऱ्यालाही व्यायामाची (importance of face yoga) गरज आहे. फेसयोगाचे काही प्रकार नियमित केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या (how to reduce wrinkles) येणं तर कमी होतंच, पण चेहरा खूप तेजस्वी, चमकदारही होतो. 

 

फेस योगा करण्याचे फायदे१. चेहऱ्यावरही चरबी जमा होते. त्यामुळे चेहरा फुगीर, सुजलेला दिसू लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी फेस योगा फायदेशीर ठरतो.

२. फेस योगा नियमित केल्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय वय वाढले तरी चेहऱ्याचे तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

३. फेस योगा केल्याने  त्वचेखाली रक्ताभिसरणाचे प्रमाण वाढून चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक येण्यास मदत होते. 

 

१. फिश फेस पोझ १. या प्रकारामध्ये ओठ आणि गाल तोंडात ओढून घेण्याचा प्रयत्न करा.

२. अशी पोझिशन केल्यानंतर समोरच्या बाजूने तुमच्या ओठांचा केवळ काही भाग दिसेल तर दोन्ही गालांवर अढी पडल्यासारखी वाटेल.

नवरात्र स्पेशल फूड : उत्तम पचनासाठी आठवणीने खावेत जवस, एक चमचाभर जवस तब्येतीसाठी ठरतात वरदान

३. १० ते १५ सेकंद ही अवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू ही पोझिशन सोडून द्या.

४. ओठांचे आणि गालांचे स्नायू मजबूत होण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.

५. ओठांच्या आजुबाजुच्या भागात अनेकदा सुरकुत्या दिसतात. त्या कमी करण्यासाठी या पोझिशनचा उपयोग होतो. 

२. माऊथ वॉश पोझ १. गाल आणि हनुवटीच्या खालच्या भागात जास्त चरबी झाली असेल तर हा व्यायाम उपयुक्त ठरतो.

नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही

२. हा व्यायाम करण्यासाठी मोठा श्वास घ्या. ओठ बंद ठेवा आणि गाल फुगवा. आता तोंडात पाणी असल्यावर चूळ भरताना आपण ज्या पद्धतीने गाल हलवतो, त्या पद्धतीने तोंडाची हालचाल करा.

३. १० ते १५ सेकंद हालचाल करा. त्यानंतर ही हालचाल सोडा. पुन्हा तोंडात हवा भरून घ्या आणि त्यानंतर पुन्हा १० ते १५ सेकंद हा व्यायाम करा. असं साधारणपणे ४ ते ५ वेळा करावं. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफिटनेस टिप्सव्यायाम