Lokmat Sakhi >Beauty > नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला

नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला

नव्या नंदा (Navya Nanda) त्वचेची आणि केसांची काळजी घेताना आधुनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरत असली तरी केस आणि त्वचा मुळापासून जपून त्यांची काळजी ( Navya Nanda hair care and skin care hacks) घेण्यासाठी आजी आईनं सांगितलेला उपायच करते. तो कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 07:18 PM2022-07-23T19:18:44+5:302022-07-23T19:35:56+5:30

नव्या नंदा (Navya Nanda) त्वचेची आणि केसांची काळजी घेताना आधुनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरत असली तरी केस आणि त्वचा मुळापासून जपून त्यांची काळजी ( Navya Nanda hair care and skin care hacks) घेण्यासाठी आजी आईनं सांगितलेला उपायच करते. तो कोणता?

Navya Nanda skin care and hair care hacks. Navya reveals secret of her hair care and skin care | नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला

नानीसारखे सुंदर केस हवे म्हणून.. नव्या नंदा सांगतेय जया बच्चन यांचा खास हेअर केअर फॉर्म्युला

Highlightsआजी जया बच्चन 75 वर्षांची झाली तरी अजूनही केसांना तेल लावून मालिश करण्याचा नियम पाळतेच, तिच्यातला हा गुण आपल्यातही आनुवांशिक गुणासारखा उतरल्याचं नव्या  सांगते. केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी नव्या पारंपरिक आणि आधुनिक उपायांचा मेळ घालते. 

अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा (Navya Nanda)  ही नव्या पिढीची प्रतिनिधी.  पण पिढी नवीन असली तरी आपल्या जुन्या पिढीतली मुळं घट्ट धरुन ठेवते, जपते, संवर्धन करते त्याचं उदाहरण म्हणजे नव्या. आपण कितीही माॅर्डन असलो, आधुनिक युगात सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळत असली तरी विषय जेव्हा केसांच्या आणि त्वचेच्या काळजीचा (hair care and skin care)  येतो तेव्हा अजूनही आजी-आईनं सांगितलेल्या पारंपरिक उपायांवरच विश्वास ठेवण्याचं प्रमाण आजही उल्लेखनीय आहे. नव्या नंदा त्वचेची आणि केसांची काळजी (Navya Nanda hair care and skin care hacks)  घेताना आधुनिक ब्यूटी प्रोडक्टस वापरत असली तरी केस आणि त्वचा मुळापासून जपून त्यांची काळजी घेण्यासाठी आजी आईनं सांगितलेला उपायच करते. 'व्होग' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने ती करत असलेल्या पारंपरिक उपायांबद्दल सांगितलं आहे.

Image: Google

नव्या म्हणते की, आजी जया बच्चनचे बंगाली गुणसूत्र आपल्यात उतरल्यानं आपलेही केस लांब आणि दाट आहेत. असे केस सांभाळणं अवघड वाटत असलं तरी आजीच्या उपायानं केस जपणं ही आपल्यासाठी फार अवघड बाब नसल्याचं नव्या सांगते. नव्या म्हणते, आजी आज 75 वर्षांची असली तरी आजही ती केसांना तेल लावून मसाज करते. आजीचा हा उपाय आपणही लहानपणापासून करतो. लहानपणी तर आजी, आई आणि आपण एका रांगेत बसून केसांना तेल लावायचो. केसांची मुळं जपण्यासाठी नव्या केस धुण्याच्या दोन तास आधी केसांच्या मुळांना दही लावते. केसांचं सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी नव्या केसांना न चुकता तेलाचा मसाज करणं, दही लावणं, शाम्पू, कंडिशनर आणि सीरम लावणं एवढा साधा सोपा उपाय करते. 

Image: Google

 त्वचेची काळजी घेण्यासाठी नव्या आई श्वेता नंदानं सांगितलेला उपाय करते.  नव्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाचा लेप लावते. किशोरवयात चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या यायच्या त्यावेळेस या चंदन लेपाचा खूप उपयोग झाल्याचं नव्या सांगते.  सौंदर्य समस्या दूर ठेवण्याचा सोपा उपाय नव्या सांगते. त्यात चंदनाचा लेप तर येतोच. सोबतच चेहेरा धुणं, चेहेऱ्याला माॅश्चरायझर लावणं आणि सनस्क्रीन ऐवजी सनब्लाॅक वापरणं यांचा समावेश आहे.  केस आणि त्वचा जपण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक उपायांचा मेळ घातल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसतातच असा विश्वास आधुनिक पिढीची प्रतिनिधी असलेल्या नव्यालाही आहे.  नव्याचे केस आणि त्वचा बघून आपल्यालाही त्याची खात्री पटते. 

Web Title: Navya Nanda skin care and hair care hacks. Navya reveals secret of her hair care and skin care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.