माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री असलेली नेहा धुपिया (Neha Dhupia) आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. सौंदर्याची काळजी घेतानाही तिचा विश्वास महागड्या सौंदर्य उत्पादनावर नसून आईनं सांगितलेल्या नैसर्गिक उपायांवर (natural remedy on beauty problems) आहे. स्टार आहे म्हणून त्यांची जीवनशैली आधुनिक, ते वापरत असलेली प्रत्येक गोष्ट आधुनिक किंवा पाश्चिमात्य असणार असा सामान्य लोकांचा समज. पण नेहा धुपिया या समजाला अपवाद ठरवते. तिच्या मते सौंदर्याची नैसर्गिकरित्या काळजी घेता येते आणि त्यासाठी खोबऱ्याचं तेल (coconut oil for beauty) प्रभावी उपाय आहे. त्वचा माॅश्चराइज (coconut oil as moisturiser) ठेवण्यासाठी आई करत असलेला उपाय नेहा धुपिया स्वत:ही करते आणि इतरांनाही सांगते. खोबऱ्याचं तेल हे सगळ्यांच्या घरात सहज आढळतं तरी सौंदर्य समस्यांवर उपाय मात्र बाहेर शोधले जातात. खोबऱ्याचं तेल इतकं बहुगुणी आहे की त्याद्वारे कोरड्या रुक्ष केसांवरही उपाय केला जातो आणि खोबऱ्याचं तेल वापरुन पायाच्या टाचांना पडलेल्या भेगाही घालवता येतात. काळे कडक झालेले पायाचे घोटे मऊ आणि उजळ करण्यासाठी खोबऱ्याचं तेल (benefits of coconut oil) वापरलं जातं तर चेहेऱ्याची नाजूक त्वचा जपण्यासाठीही खोबऱ्याचं तेल वापरता येतं. कोरड्या त्वचेच्या समस्या, चेहेऱ्यावरील ब्लॅक हेड्स आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा विशिष्ट पध्दतीनं उपयोग करता येतो.
Image: Google
कोरड्या त्वचेसाठी खोबऱ्याचं तेल आणि ओटमील पावडर
कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी खोबऱ्याचं तेलात फायदेशीर गुणधर्म असतात. खोबऱ्याच्या तेलात सूज आणि दाहविरोधी, जिवाणुविरोधी आणि बुरशी विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे खोबऱ्याचं तेल हे औषधी तेल म्हणून ओळखलं जातं. त्वचेसाठी नैसर्गिक माॅश्चरायझर म्हणून खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग होतो. कोरड्या त्वचेशी निगडित समस्यांवर 1 लहान चमचा खोबऱ्याचं तेल, अर्धा चमचा दही आणि 1 लहान चमचा ओटमील पावडर एकत्र करुन त्याची मऊसर पेस्ट करावी. ही पेस्ट चेहेऱ्यावर लावावी. 15 मिनिटांनी चेहेऱ्यावर गोल मसाज करात कोमट पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून चेहेऱ्याला जेल लावावं.
Image: Google
2. ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि बेकिंग सोडा
नाकावर, हुनवटीवर ब्लॅक हेड्स असल्यास त्यावर खोबऱ्याचं तेल हा उत्तम उपाय आहे. ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी 2 लहान चमचे खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्यात थोडा लिंबाचा रस आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालावा. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. हा लेप नाक, हुनवटी, कपाळावर ( ज्या ठिकाणी प्रामुख्यानं ब्लॅक हेड्स असतात) लावावा. 5-7 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपानं केवळ ब्लॅक हेड्सच जातात असं नाही तर त्वचा नैसर्गिकरित्या खोलवर स्वच्छ होते. त्वचेच्या रंध्रात अडकलेली घाण , जास्तीचं तेल निघून जाऊन रंध्रं स्वच्छ होतात.
Image: Google
3. डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी
खोबऱ्याचं तेल नैसर्गिक माॅश्चरायझर म्हणून ओळखलं जातं. तसेच त्वचा स्वच्छ करणारे, उजळ करणारे घटकही या तेलात असतात. चेहेऱ्यावर असलेले काळे डाग, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी खोबऱ्याचं तेल हा उत्तम उपाय आहे. यासाठी खोबऱ्याच्या तेलाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते.