Lokmat Sakhi >Beauty > फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

6 Common Mistakes To Avoid While Doing Your Facial : फेशियल करताना होणाऱ्या चुका टाळल्या तर, फेशियल केल्याचे चांगले परिणाम तुमच्या चेहेऱ्यावर दिसून येतील......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 02:35 PM2023-04-10T14:35:22+5:302023-04-10T14:54:15+5:30

6 Common Mistakes To Avoid While Doing Your Facial : फेशियल करताना होणाऱ्या चुका टाळल्या तर, फेशियल केल्याचे चांगले परिणाम तुमच्या चेहेऱ्यावर दिसून येतील......

Never Make These 6 Common Mistakes While Doing A Facial | फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

फेशियल करताना वारंवार होणाऱ्या ६ चुका टाळा, चेहरा दिसेल उजळ व चमकदार...

चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अधूनमधून चेहऱ्याचे फेशियल करणे आवश्यक असते. विशेषकरुन महिला आपल्या त्वचेच्या आरोग्याची खूपच जास्त काळजी घेतात. यासाठी काही महिला दर महिन्याला अवश्य पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेताना दिसतात. त्यातल्याच एका ट्रिटमेंटपैकी एक सर्वात महत्वाची स्किन क्लिनिंग पद्धती म्हणजे फेशियल. फेशियल करताना सर्वप्रथम क्लिनिंग, स्टिमिंग, मसाज, स्क्रबिंग, फेसपॅक लावणे अशा काही सध्या सोप्या पद्धतीने फेशियल केले जाते.  

आपल्याकडे फेशियलचे असंख्य प्रकार असतात. त्यापैकी आपल्या त्वचेला कोणत्या प्रकारचे फेशियल सूट होईल याचा विचार फेशियल करण्यापूर्वी नक्की एकदा तरी करावा. फेशियल केल्याने तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होऊन त्वचेला अधिक चमक येते. प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणे सर्वांनाच परवडेल किंवा वेळेत बसेल असे नसते. त्यामुळे घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करुन आपण पार्लरसारखाच फेशियल ग्लो चेहऱ्यावर आणू शकतो. परंतु घरच्या घरी किंवा पार्लरमध्ये फेशियल करताना हमखास होणाऱ्या काही चुका टाळल्या तर नक्कीच, फेशियल केल्याचे चांगले परिणाम तुमच्या चेहेऱ्यावर दिसून येतील(Never Make These 6 Common Mistakes While Doing A Facial).

फेशियल करताना हमखास होणाऱ्या ६ चुका कोणत्या ?  

चूक १. अस्वच्छ फेशियल टूल्स वापरणे टाळा :- चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागाचे फेशियल करताना आपण विविध फेशियल टूल्सचा वापर करतो. हे फेशियल टूल्स कायम स्वच्छ असले पाहिजे. फेशियल करण्यास सुरुवात करताना आपण सर्वप्रथम आपला चेहरा स्वच्छ करुन घेतो. त्यानंतर आपण फेशियल करण्यास सुरुवात करतो. फेशियल करताना वेगवेगळ्या प्रकारच्या फेशियल टूल्सने आपण चेहेऱ्यावर मसाज किंवा एक्सफोलिएशन करुन घेतो. अशावेळी वापरण्यात येणारे हे फेशियल टूल्स स्वच्छ असले पाहिजेत. फेशियल करताना अस्वच्छ फेशियल टूल्सचा वापर चेहऱ्यावर केल्यास चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला जंतू संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. अस्वच्छ फेशियल टूल्सच्या वापराने त्वचा लाल होणे, त्वचेवर बारीक बारीक पुरळ येणे, त्वचेवर रॅश येणे, पिंपल्स येणे यांसारख्या असंख्य समस्या उद्भवू शकतात. यासाठी अस्वच्छ फेशियल टूल्स वापरणे संपूर्णपणे टाळावे. फेशियल किटमधील सर्व फेशियल टूल्स फेशियल झाल्यानंतर वेळोवेळी स्वच्छ करुन ठेवावेत. जेणेकरुन पुढच्या वापरासाठी आपल्याला स्वच्छ फेशियल टूल्स सहज वापरायला मिळू शकतात. बाहेर फेशियल करताना, फक्त पैसे किती घेतात, एवढाच विचार करू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. ती किती पाळले जाते, हे पाहावं. कारण स्वच्छता योग्य नसेल तर अनेक संसर्गजन्य रोग एकाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतात. म्हणून वस्तू निर्जंतुक करून वापरतात का, वापरण्यात येणाऱ्या वस्तू डिस्पोजेबल आहेत का, याची माहिती करून घ्यावी.

चूक २. फक्त चेहेऱ्यावरच फोकस करणे :- फेशियल करताना आपण सहसा प्रत्येकवेळी सर्वप्रथम चेहऱ्यावरचं फोकस करतो. फेशियल करताना आपण केवळ चेहऱ्याच्याच त्वेचेचे फेशियल करतो हे काही अंशी योग्य आहे, परंतु असे केल्यास चेहेऱ्याच्या त्वचेचा रंग बदलतो आणि मानेकडील भागाचा रंग वेगळा दिसतो. असे केल्याने फक्त चेहेऱ्यावरील त्वचेचे क्लिनिंग होऊन चेहेऱ्याजवळील इतर त्वचेच्या भागाचे क्लिनिंग होत नाही. खरंतर फेशियल करताना चेहऱ्यासोबतच चेहेऱ्याजवळील व मानेजवळील भागाचे फेशियल करणे देखील तितकेच महत्वाचे असते. वास्तविक बघता, चेहऱ्यापेक्षा मानेजवळील त्वचेला फेशियलची अधिक गरज असते. यामुळे फेशियल करताना चेहेऱ्याबरोबरच, चेहऱ्याजवळील व मानेच्या भागावरील त्वचेचे फेशियल करणे देखील महत्वपूर्ण आहे. त्यामुळे फेशियल करताना केवळ चेहेऱ्यावरच फोकस न करता इतर भागावरील त्वचेचे फेशियल करावे. 

भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट...

चूक ३. हार्श स्क्रबिंग करणे :- फेशियल करताना क्लींजिंग नंतर स्क्रबिंग करणे ही सर्वात महत्वाची स्टेप येते. शक्यतो स्क्रबिंग करताना आपल्यापैकी बरेचजण खूप जास्त हार्श स्क्रबिंगचा वापर करतात. स्क्रबिंग करण्यासाठी आपण आर्टिफिशल सौंदर्य प्रसाधन असलेले व बऱ्याच केमिकलयुक्त स्क्रबरचा सर्रास वापर करतो. चेहेऱ्याच्या त्वचेचे स्क्रबिंग करताना शक्यतो त्वचा न रगडता, हलक्या हाताने स्क्रबिंग करावे. त्याचबरोबर, स्क्रबिंग करताना चेहऱ्यावर स्क्रब ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्तवेळ घासू नये. चेहऱ्यावर जास्त वेळासाठी स्क्रबिंग केल्याने चेहऱ्याची त्वचा निस्तेज, रुक्ष व खरखरीत होऊ शकते.  

चूक ४. गरम पाण्याचे स्टीमिंग न करणे :- बहुतेकजणी फेशियल करताना गरम पाण्याचे स्टीमिंग म्हणजेच चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ देणे टाळतात. बऱ्याचदा घरगुती फेशियल करताना गरम पाण्याचे स्टीमिंग करणे टाळले जाते. परंतु वास्तविक बघता गरम पाण्याचे स्टीमिंग केल्याने आपल्या चेहेऱ्यामध्ये अधिक फरक जाणवतो. तसेच स्टीमिंग केल्याने फेशियलचे उत्तम परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतात. स्टीमिंगमुळे, कोणतेही सौंदर्य प्रसाधन आपल्या  त्वचेमध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाते आणि आपल्या त्वचेवर त्याचे चांगले परिणाम दिसतात. त्यामुळे जर आपल्याला फेशियलचे उत्तम परिणाम चेहऱ्यावर दिसायला हवे असतील तर चेहऱ्यावर मसाज केल्यावर गरम पाण्याचे स्टीमिंग देखील घेतले पाहिजे.

वॅक्सिंग केल्यावरही त्वचेवर बारीक बारीक टोकदार केस येतात? ५ टिप्स- इनग्रोन हेअरचा त्रास कमी...

चूक ५. फेशियल प्रॉडक्टस तपासून न घेणे :- फेशियल करण्यापूर्वी त्यासाठी लागणारे फेशियल प्रॉडक्टस तपासून खूपच महत्वाचे असते. सध्याच्या काळात बाजारात अनेक प्रकारचे फेशियल किट उपलब्ध असतात. अनेकदा आपण कोणताही विचार न करता कोणताही किट विकत घेतो आणि त्याचा वापर सुरू करतो. परंतु असे करणे शक्यतो टाळावे. कोणतेही फेशियल किट खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार आणि त्याच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. यासोबतच उत्पादनातील घटक आणि त्याची एक्सपायरी डेट वगैरेही तपासणे आवश्यक आहे. जर तुमची उत्पादने फेशियल करताना योग्य असतील तर तुमच्या त्वचेलाही त्याचा फायदा होईल. गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम यांसारख्या नावावरुन फेशियल उत्तम असेल असे ठरवू नये. एक महागातले फेशियल केलं, की सहा महिने पहायला नको, असा दृष्टिकोन फेशियल करताना उपयोगी नाही. फेशियल झाल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं.  

चूक ६. त्वचा फेशियल योग्य आहे का हे तपासावे :- सर्वात प्रथम आपण फेशियलला योग्य आहोत की नाही, याचा विचार करावा. कारण बऱ्याच त्वचारोगांत फेशियल करायचं नसतं. तेव्हा अट्टाहासानं फेशियल करून घेऊ नये. तसेच, ज्यांच्याकडून फेशियल करून घेणार आहोत त्यांच्याकडून आपल्या त्वचेचा प्रकार समजून घ्यावा. आपल्याला एखादी शारीरिक समस्या असल्यास त्याचाही उल्लेख करावा. तसेच, कोणत्या गोष्टींची अ‍ॅलर्जी असल्यास, त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी. नवीन कोणतंही उत्पादन वापरणार असल्यास त्याची माहिती घ्यावी. तसेच, आवश्यकता असल्यास त्वचेची टेस्ट करावी.

Web Title: Never Make These 6 Common Mistakes While Doing A Facial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.