दररोज आपण त्चचेची म्हणावी तशी काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे मग हळूहळू त्वचा डल दिसू लागते, डेड स्किनचे प्रमाण वाढू लागते. टॅनिंग वाढते. या सगळ्या गोष्टींमुळे मग त्वचा रुक्ष होते. म्हणूनच त्वचेला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी नियमितपणे फेशियल, क्लिनअप यासारखे उपचार करून घेतले पाहिजे, असं सौंदर्यतज्ज्ञ नेहमीच सांगतात. फेशियल करायचं असेल तर डी टॅन फेशियल, फ्रुट फेशियल, गोल्ड फेशियल हे असे सगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण सध्या ऑक्सिजन फेशियल हा ट्रेण्ड खूप व्हायरल होत आहे (New trend of oxygen facial). बघा हा नेमका काय प्रकार असतो (how to do oxygen facial?) आणि त्यामुळे त्वचेला कसा फायदा होतो.(benefits of oxygen facial)
ऑक्सिजन फेशियल म्हणजे काय?
इतर कोणत्याही फेशियलप्रमाणेच ऑक्सिजन फेशियलची सुरुवातही स्किन क्लिंजिंग करून होते. यामध्ये वेगवेगळे क्रिम लावून त्वचा स्वच्छ केली जाते. त्यानंतर स्क्रबिंग करून त्वचेवरची डेड स्किन काढून टाकली जाते.
तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात हे सांगणारी ८ लक्षणं! तुमच्या शरीरातही हे बदल होत आहेत का?
यानंतर जेव्हा त्वचा स्वच्छ होते तेव्हा तिच्यावर सिरम लावले जाते. या सिरममध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. तुमची त्वचा कशी आहे, त्वचेवर किती पिगमेंटेशन, सुरकुत्या, ॲक्ने, पिंपल्स आहेत यावरून सिरमची निवड केली जाते. त्यानंतर सिरम लावत असतानाच त्वचेवर एका मशिनद्वारे ऑक्सिजनचा स्प्रे मारला जातो.
अतिशय जास्त दाबाने त्वचेवर एका विशिष्ट पद्धतीने ऑक्सिजनचा मारा केल्यामुळे सिरममधले पोषक पदार्थ त्वचेमध्ये खाेलपर्यंत जातात. पाऊण तास ते एक तास ही सगळी प्रक्रिया चालते. यालाच ऑक्सिजन फेशियल असं म्हणतात.
साडी नेसल्यावर सोज्वळ लूक हवा? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक
यानंतर त्वचेला रिलॅक्स करण्यासाठी आणि त्वचेमधले रक्ताभिसरण वाढण्यासाठी हळूवार मसाज केली जाते. त्यानंतर त्वचेवर एखादा मास्क लावला जातो.
ऑक्सिजन फेशियल केल्यामुळे त्वचेला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळून रक्ताभिसरण क्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळे त्वचेवर छान ग्लो येऊन त्वचा अधिक चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत होते.