Lokmat Sakhi >Beauty > नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

Nita Ambani Hair Stylist Amit Thakur Shares Three Mistakes Which Damages Hair : केसांची काळजी घेताना आपण नकळतपणे काही चुका करतो, त्या कोणत्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 04:37 PM2024-07-29T16:37:07+5:302024-07-29T16:55:29+5:30

Nita Ambani Hair Stylist Amit Thakur Shares Three Mistakes Which Damages Hair : केसांची काळजी घेताना आपण नकळतपणे काही चुका करतो, त्या कोणत्या..

nita ambani hair stylist shares secret to stop hair breaking without spending money | नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

नीता अंबानींचा हेअरस्टायलिस्ट सांगतो, महिलांच्या ३ चुकांमुळेच होतात चांगले केस खराब-त्या कोणत्या?

वयाच्या साठाव्या वर्षी देखील नीता अंबानी (Nita Ambani) तितक्याच यंग आणि कमालीच्या फिट दिसतात. वयाच्या साठीतही नीता अंबानी यांचं सौंदर्य तरुणाईला लाजवेल असं आहे. त्या तेवढ्याच स्टायलिश आणि फॅशनेबल देखील आहेत. नीता अंबानी प्रत्येक इव्हेंटमध्ये एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसत नाहीत. त्या प्रत्येक कार्यक्रमात अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात कारण त्या अप्रतिम मेकअपसोबतच त्याला साजेशी अशी हेअर स्टाईल करतात. कोणत्याही प्रकारचे आऊटफिट असो त्याला सूट होणारी हेअरस्टाईल केल्याने आपल्या लूकमध्ये बराच फरक पडतो. नीता अंबानी प्रत्येक समारंभात त्यांच्या आऊटफिटला सूट होईल अशी हेअर स्टाईल करुन आपल्या लूकमध्ये आणखीनच भर घालतात(Nita Ambani Hair Stylist Amit Thakur Shares Three Mistakes Which Damages Hair).

नीता अंबानी यांची हेअर स्टाईल करुन त्यांच्या केसांना हटके लुक देण्याचे श्रेय हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांना जाते. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनपासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या फंक्शनमध्ये अमित ठाकूर यानेच त्यांच्या हेअर स्टाईल केल्या होत्या. तसेच, अमितने केवळ अंबानींसाठीच नव्हे तर प्रियांका चोप्रापासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केले आहे. हेअर एक्स्पर्ट अमित ठाकूर सोशल मिडियाद्वारे केसांबद्दल अनेक प्रकारची माहिती सतत पोस्ट करत असतो. केसांची काळजी कशी घ्यावी, केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे अशा अनेक टिप्स अमित नेहमी शेअर करत असतो. नुकतेच अमितने त्याच्या सोशल मिडीयावर केसांची काळजी घेताना कोणत्या ३ प्रकारच्या चुका करु नये याबद्दल अधिक माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे(nita ambani hair stylist shares secret to stop hair breaking without spending money).

केसांची निगा राखताना या ३ चुका करु नका... 

चूक १ :- रात्री झोपण्यापूर्वी केस धुणे आणि ते न वळवता तसेच ओले ठेवून झोपणे. 

जर तुम्ही काही कारणास्तव रात्री झोपण्यापूर्वी केस धूत असाल तर ते योग्य नाही. जर आपण झोपण्यापूर्वी केस धुतले आणि केस संपूर्णपणे न वाळवता तसेच ओले ठेवले तर केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी केस धुतले आणि ते न वाळवता तसेच ओले ठेवले तर केसांचे नुकसान होऊ शकते. ओले केस हे कमकुवत असतात त्यामुळे कधीच केस ओले ठेवून झोपू नये. नेहमी आपले केस संपूर्णपणे पुसून कोरडे करण्याचा सल्ला अमित देतो.  यासाठी आपण हेअर ड्रायरचा वापर करु शकता. परंतु हेअर ड्रायरचा वापर देखील मोजक्या प्रमाणातच करावा. याउलट आपण मोकळ्या हवेचा वापर करुन केस नैसर्गिक पद्धतीने सुकवू शकतात. 

अळशीचा हा घ्या उपाय! केस कितीही ड्राय-खराब असो, काही मिनिटांत होतील सॉफ्ट आणि सिल्की...

चूक २ :- केसांसाठी हिटिंग टूलचा वारंवार वापर करणे. 

केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करण्यासाठी आपण केसांवर हिटिंग टूलचा वापर करतो. परंतु या हिटिंग टूलचा वापर वारंवार केल्यास केसांच्या मुळांना इजा होऊन केसगळती किंवा केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. स्ट्रेटनरसारख्या हिटिंग टूलचा वापर केल्याने केसांचे खूप नुकसान होते. जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य आणि सौंदर्य हवे असेल तर केसांसाठी हिटिंग टूलचा वापर करणे टाळा. 

चूक ३ :- रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपणे. 

रात्री झोपताना केस मोकळे ठेवून झोपणे हे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. रात्री झोपताना केस मोकळे ठेवल्यानेही त्याचे नुकसान होते. झोपताना केस मोकळे ठेवल्याने आपले केस आणि उशी यांच्यात घर्षण होते, यामुळे केस तुटतात. झोपायच्या आधी केसांचा पोनी टेल किंवा लूज वेणी बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला.

ओल्या केसांवर तेल लावताय? थांबा, त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात योग्य पद्धत, नाहीतर केसांचे त्रास वाढतील...


Web Title: nita ambani hair stylist shares secret to stop hair breaking without spending money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.