आपले डॅमेज झालेले केस पुन्हा पाहिल्यासारखे करण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी आपण महागड्या ट्रीटमेंट्स देखील करुन घेतो. या ट्रिटमेंट्स करुन घेताना त्याचे पुढे आपल्या केसांवर काय परिणाम होणार आहेत, याचा विचार करत नाही. हेअर डॅमेज होऊन केसांचे नैसर्गिक सौंदर्य व आरोग्य हरवते यासाठी केस पुन्हा पाहिल्यासारखे करण्यासाठी हेअर बोटॉक्स किंवा केरोटिन ट्रिटमेंट केल्या जातात(Nita Ambani, Alia Bhatt’s hairstylist decodes hair Botox and Keratin treatments; why he never recommends them).
हेअर डॅमेज थांबविण्यासाठी अशा हेअर ट्रिटमेंट्स करुन घेणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर यावर बॉलीवूड अभिनेत्रींचा सुप्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर (Amit Thakur) याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अमित ठाकूर याने ही पोस्ट शेअर करत डॅमेज केसांसाठी कोणत्याही प्रकारची हेअर ट्रिटमेंट करणे योग्य की अयोग्य ? याचबरोबर केस खराब झाले असतील तर हेअर ट्रिटमेंट्स न घेता नॅचरल पद्धतीने पुन्हा पाहिल्यासारखे केस करण्यासाठी नक्की कोणते उपाय फॉलो करावेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे(Nita Ambani's hairstylist Amit Thakur reveals dangers of hair Botox and Keratin treatments).
१. बोटॉक्स हा डॅमेज झालेल्या केसांसाठी कायमस्वरूपी उपाय नाही...
बॉलिवूड हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूरच्या मते, हेअर बोटॉक्स ही फक्त एक डिप कंडिशनिंग हेअर ट्रिटमेंट आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. या उपचारामध्ये केसांच्या बाहेरील थराला पोषक जेल आणि क्रिम लावले जाते. पण खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी हा कायमस्वरूपी उपाय नाही. एकदा हेअर बोटॉक्स ट्रिटमेंट केल्याने त्याचा परिणाम केसांवर फक्त २ ते ४ महिनेच टिकतो. त्यानंतर पुन्हा आपले केस आहेत तसेच पूर्ववत होतात.
बाटलीतील आयलायनर सुकले? ही घ्या तेच लायनर लावण्याची एक भन्नाट ट्रिक, झ्टपट सोल्यूशन...
२. केसांच्या केरॉटिन हेअर ट्रिटमेंटमुळे होऊ शकतो कँसर...
केसांच्या केरॉटिन हेअर ट्रिटमेंटबद्दल हेअर स्टायलिस्ट अमित सांगतो की, केरॉटिन हे एक प्रोटीन आहे, जे नैसर्गिकरित्या आपल्या केसांमध्ये आधीच असते. पण या उपचारात फॉर्मल्डिहाइडसारखी काही रसायने वापरली जातात. अनेक देशांमध्ये या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे कारण त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. यामुळेच असल्या हेअर ट्रिटमेंट्स करताना थोडी काळजी घेतली पाहिजे.
३. केसांसाठी हेअर ट्रिटमेंट्स करण्याचे दुष्परिणाम कोणते...
बॉलिवूड हेअर स्टायलिस्ट अमित सांगतो की, हेअर बोटॉक्स किंवा केरोटिन ट्रिटमेंट या केसांसाठी थोड्या सौम्य आणि चांगल्या आहेत. परंतु या ट्रिटमेंट्स करताना जे हेअर प्रॉडक्ट्स वापरले जातात त्यात केमिकल्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे केस खूपच खराब होतात. याचबरोबर केसांचे नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्य खराब होते. या हेअर ट्रिटमेंट्स करताना केसांमधील पोषक घटक सील करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात हिटचा वापर केला जातो. आणि जेव्हा केस खूप उष्णतेच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक प्रथिनांची रचना बिघडू लागते, यामुळेच केसांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही ट्रिटमेंट केल्यानंतर केसांचे सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही मेंटेन करण्यासाठी दर काही महिन्यांच्या अंतराने या ट्रिटमेंट्स पुन्हा करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत, या ट्रिटमेंट्स वारंवार करुन तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत आणि खराब होतात.
फेशियल ग्लो जास्त दिवस हवा तर करु नका या ८ चुका, नाहीतर ग्लो होईल गायब...
४. नैसर्गिक उपचारांनी केस निरोगी ठेवा...
बॉलिवूड हेअर स्टायलिस्ट अमितने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, तो त्याच्या कोणत्याही क्लायंटला या हेअर ट्रिटमेंट्स करण्याचा सल्ला देत नाही. केसांची निगा राखण्यासाठी नैसर्गिक उपचार अधिक चांगले आहेत, असे त्यांचे मत आहे. यासाठी केसांना नियमित तेल लावणे, संतुलित आहार घेणे, योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरण्याचा सल्ला त्याने दिला आहे.