आपल्याला वारंवार धुळीचा, प्रदुषणाचा सामना करावा लागतो. खूप उन्हात किंवा खूप थंडीतही जावं लागतं. याचा परिणाम कळत नकळत आपल्या त्वचेवर होतो. वारंवार या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागल्यामुळे त्वचेचा पोत खराब होतो आणि त्वचा कमी वयातच प्रौढ (how to get skin without wrinkles) दिसू लागते. म्हणजेच त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊ लागतात. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी मग आपण वेगवेगळे उपाय करतो, अनेक केमिकल्स ट्राय करतो. पण याचा परिणाम होताेच असे नाही. म्हणूनच तर हा घ्या एक वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला उपाय आणि मिळवा एजलेस, तरुण, चमकदार त्वचा. (acupressure points for glowing skin)
आपल्याला ॲक्युप्रेशर थेरपीबाबत (acupressure therapy for skin) माहिती आहेच. शरीरात असलेले अनेक प्रेशर पॉईंट्स दाबून अनेक आजारांतून बरे होता येते, याचा अनुभव अनेक जणांनी घेतलेला आहे. आता हीच गोष्ट आपल्याला आपल्या चेहऱ्याबाबत करायची आहे आणि त्वचेचे सौंदर्य खुलवायचे आहेत. सौंदर्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील असे ५ ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपल्या चेहऱ्यावर आहेत. हे पॉईंट्स दररोज फक्त ३० सेकंंदांसाठी प्रेस करा. यासाठी वेळेचेही बंधन नाही. तुम्हाला जमेल त्या कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे चेहऱ्यावर अकाली येऊ लागलेल्या सुरकुत्या तर जातीलच पण त्यासोबतच अनेक फायदेही होतील. हा उपाय इन्स्टाग्रामच्या poojaluthraofficial या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
चेहऱ्यावरील ॲक्युप्रेशर पॉईंट्स प्रेस केल्याने होणारे फायदे
- चेहऱ्यावर दिसू लागलेल्या अकाली सुरकुत्या कमी होतील आणि चेहरा अधिक तरुण दिसू लागेल.
- मन शांत होण्यासाठीही यापैकी एक पॉईंट अतिशय उपयुक्त ठरतो.
- यामुळे त्वचेमधले रक्ताभिसरण वाढते आणि त्यामुळे त्वचा अधिक चमकदार, ग्लोईंग दिसू लागते.
- त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
- चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येण्याचा त्रास कमी होतो.
- चेहऱ्यावरील काळे डागदेखील कमी होतात.
हे आहेत चेहऱ्यावरील ५ ॲक्युप्रेशर पॉईंट्स
१. सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपल्या दोन्ही भुवयांच्या अगदी मधोमध.
२. दुसरा पॉईंट आहे गालांवर. सरळ रेषेत पाहिल्यावर आपली बुबुळे जिथे असतील तिथून सरळ खाली बोट आणा. जिथे चिकबोन संपतो त्याच्या खाली दोन्ही बाजूंना प्रेशर पॉईंट्स आहेत.
३. तिसरा प्रेशर पाॅईंट आहे दोन्ही नाकपुड्यांच्या दोन्ही बाजूंना.
४. खालच्या ओठाच्या खाली अगदी मध्यभागी चौथा प्रेशर पॉईंट आहे.
५. पाचवा प्रेशर पॉईंट आहे दोन्ही ओठ जिथे जुळतात त्या दोन्ही टोकांच्या अगदी बाजूला.